Worli Accident: मिहीर शाहाला दारू देणं भोवलं, 'त्या' पबवर चालला बुलडोझर!

मुंबई तक

ADVERTISEMENT

मिहीर शाहाला दारू देणं भोवलं, 'त्या' पबवर चालला बुलडोझर!
मिहीर शाहाला दारू देणं भोवलं, 'त्या' पबवर चालला बुलडोझर!
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुंबईतील वरळी कार अपघात प्रकरणी बारवर कारवाई

point

बारचा अनधिकृत भाग बुलडोझरने पाडला

point

मिहीर शाहला दारू दिल्याचं उघड होताच बार करण्यात आला सील

Mumbai BMW Hit-And-Run: मुंबई: मुंबईतील वरळी कार अपघात प्रकरणातील आरोपी मिहीर शाह (वय 24 वर्ष) याला दारू पुरवणाऱ्या जुहूमधील बारवर आज थेट बुलडोझरच चालविण्यात आला. उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी हा बार सील केल्यानंतर 24 तासातच या बारचा काही भाग हा तात्काळ पाडण्यात आला. (bulldozer ran on the pub where mihir shah had drunk alcohol know under which law action was taken)

व्हाइस-ग्लोबल तापस बारने मिहीर शाह याला दारू पुरवली होती. पण बारमध्ये दारू सर्व्ह करण्याचं वय हे 25 वर्ष आहे. पण त्या वयापेक्षा कमी वय हे मिहीर शाहच आहे. अपघातापूर्वी शनिवारी रात्री उशिरा मिहीर येथे पोहोचला आणि रविवारी सकाळपर्यंत तो बारमध्येच होता. येथून निघाल्यानंतर मिहीरने एका स्कूटरला त्याच्या कारने धडक दिली, ज्यामुळे स्कूटरवर बसलेल्या महिलेचा मृत्यू झाला. त्याचवेळी तिचा पती हा गंभीर जखमी झाला होता.

'तो' पब केला सील 

अल्पवयीन लोकांना दारू पुरवण्याबरोबरच, योग्य परवाना नसताना मद्य सेवा दिल्याबद्दल आणि मालमत्तेवर बेकायदेशीर बांधकाम केल्याबद्दल आधी बार सील करण्यात आला होता. यानंतर आज (10 जुलै) बारचे अवैध बांधकाम पाडण्यात आलं. बेकायदा बांधकाम पाडण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांनी बॉम्बे फॉरेन लिकर रुल्सच्या संबंधित तरतुदींनुसार कारवाई केल्याचे सांगितले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> Worli Accident : मिहीर शाहाच्या कबुलीने 'हिट अँड रन' प्रकरणात मोठा ट्विस्ट

मिहीरची आई आणि बहिणींनाही अटक

मिहीर शाह हा राजकीय नेते राजेश शहा यांचा मुलगा आहे. अपघातानंतर तो फरार झाला होता. घटनेनंतर जवळपास 60 तास बेपत्ता राहिल्यानंतर मिहिरला मंगळवारी दुपारी अटक करण्यात आली होती. मिहिरला त्याची आई आणि दोन बहिणींसह काल मुंबईपासून 65 किमी अंतरावर असलेल्या विरारमधील एका अपार्टमेंटमधून अटक करण्यात आली होती. 

मिहीरला लपण्यास मदत करणाऱ्या त्याच्या आई आणि बहिणींना शाहपूर येथून अटक करण्यात आलं होतं. मिहिर शाहचे वडील आणि फॅमिली ड्रायव्हर राजऋषी बिदावत यांनाही रविवारी अटक करण्यात आली होती.

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> Worli Accident : 'गरीब रोज असेच रस्त्यावर मरतील', कावेरी नाखवांच्या पतीचा ह्रदय पिळवटून टाकणारा आक्रोश

शिवसेनेने मिहीरच्या वडिलांना हटवले पदावरून 

राजेश शहा यांना सोमवारी 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मिळाला. मात्र आता त्यांना शिवसेनेने (शिंदे गट) त्यांना पदावरून हटवलं आहे. राजेश शहा यांनी पुरावे नष्ट करण्यास मदत करणं, बीएमडब्ल्यू कारची नंबर प्लेट तोडणं यासारखे अनेक आरोप त्यांच्यावर आहेत. राजेश शहा याच्या अटकेनंतर शिंदे गटावर बरीच टीका झाली होती. ज्यानंतर त्याला पक्षातून हटविण्याचा निर्णय घेण्यात आलं. 

ADVERTISEMENT

शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांनी यासंदर्भातील माहिती दिली. शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशावरून राजेश शाह, पालघर यांना शिवसेना उपनेता पदावरून कार्यमुक्त करण्यात येत आहे, असे मोरे यांनी सांगितले.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT