बायकोचे तरुणाशी विवाहबाह्यसंबंध, जेवणानंतर दुधात नशेच्या गोळ्या मिसळल्या, नंतर बॉयफ्रेंडसोबत रात्री नको तेच...

मुंबई तक

Crime News : देशभरात सध्या विवाहबाह्यसंबंधात मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागलेली आहे. एका महिलेनं आपल्या सासरच्या मंडळींच्या दुधात औषध मिसळलं. त्यानंतर कुटुंबीय बेशुद्ध अवस्थेत पडले होते. तेव्हा महिलेनं आपल्या बॉयफ्रेंडसोबत नको तेच केलं. या घटनेचा खुलासा दुसऱ्या दिवशी झाल्याने घटनास्थळी एकच खळबळ उडालीय.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

'पत्नीचे हरविंदर नावाच्या एका तरुणाशी प्रेमसंबंध'

point

दुधात औषध मिसळून बॉयफ्रेंडसोबत...

Crime News : एका नवविवाहितेनं आपल्या सासरच्या मंडळींच्या दुधात नेशेच्या गोळ्या टाकल्या होत्या. नंतर संपूर्ण कुटुंब बेशुद्ध पडल्यानंतर, आरोपी वधूने घरातून एक लाख रुपये रोख रक्कम आणि दागिने घेऊन एक्स बॉयफ्रेंडसोबत घटनास्थळावरून पळ काढला. ही लज्जास्पद घटना मुरादाबाद जिल्ह्यातील दिलापी पोलीस ठाणे परिसरात घडल्याचे वृत्त आहे. 

हे ही वाचा : मुरलीधर मोहोळ रुग्णालयात दाखल, 29 वर्षांपूर्वीचा त्रास उद्भवल्याने शस्त्रक्रिया

'पत्नीचे हरविंदर नावाच्या एका तरुणाशी प्रेमसंबंध'

पोलिसांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पीडितेनं म्हटलं साहेब, माझा एका वर्षांपूर्वी विवाह झाला होता. पतीचा आरोप असा की, पत्नीचे हरविंदर नावाच्या एका तरुणाशी प्रेमसंबंध होते, ते लग्नानंतरही तसेच सुरु होते. नवऱ्याने तिला अनेकदा प्रियकरासोबत पकडले होते आणि तिला समजावून देखील सांगण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तिचे मार्ग सुधारण्याऐवजी अधिक बिघडू लागसे होते, अशातच तिने संपूर्ण कुटुंबाला संपण्याचा कट रचला होता. 

दुधात औषध मिसळून बॉयफ्रेंडसोबत...

10 मार्च रोजी तिने दुधात औषध मिसळले होते. दूध घेतल्यानंतर, संपूर्ण कुटुंब बेशुद्ध अवस्थेत होते. नंतर तिने घरातील कपाटातून पैसे आणि काही ऐवज घेऊन घटनास्थळावरून पळ काढला होता. दुसऱ्या दिवशी दुपारनंतर घर अगदीच शांत होते, तेव्हा शेजारच्या मंडळींनी कुटुंबाला जागे केले. कुटुंब जेव्हा शुद्धीवर आले त्यानंतर घरातील कपाट रिकामे आढळून आले आणि त्यांची सून गायब असल्याचे आढळून आले. पीडितेनं आरोप केला की, त्याची पत्नी वारंवार त्याला खोट्या प्रकरणांमध्ये अडकवण्याची धमकी देत होती. 

हे ही वाचा : पुण्यात काळजाचा ठोका चुकवणारी घटना, चिमुरडीचे इवले हात लिफ्टच्या दारात अडकले, घटनेचा थरार CCTV मध्ये कैद

दरम्यान, पीडिताच्या पतीने दिलेल्या तक्रारीवरून दिलारी पोलीस ठाणे गाठलं आणि संबंधित महिला आणि तिचा प्रियकर हरविंदर यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. अशातच फरार जोडप्याचा पोलीस शोध घेत आहेत. 

हे वाचलं का?

    follow whatsapp