विदेशात शिक्षण घेऊन परतला, अन् घरांमधून महिलांचे अंतर्वस्त्र चोरायचा, कारण वाचून हैराण व्हाल!
Crime News : महिलांचे अंतर्वस्त्र चोरणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. मानसिक तणावामुळे आणि मित्राच्या सल्ल्यानंतर त्याने अशा प्रकारच्या चोऱ्या सुरू केल्याचा दावा पोलिस चौकशीत समोर आला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
विदेशात शिक्षण घेऊन परतला
अन् घरांमधून महिलांचे अंतर्वस्त्र चोरायचा, कारण वाचून हैराण व्हाल!
Crime News : हल्द्वानीच्या नवाबी रोड परिसरात घडलेल्या एका विचित्र चोरीच्या प्रकरणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या प्रकरणात पोलिसांनी अशा एका आरोपीला अटक केली आहे, जो पैसे, दागिने किंवा इतर मौल्यवान वस्तू न चोरता केवळ महिलांचे अंतर्वस्त्र चोरत होता. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून सोशल मीडियावरही या प्रकरणाची मोठी चर्चा सुरू आहे. ही घटना 19 जून 2026 रोजी रात्री घडली. नवाबी रोडवरील महेश नगर येथे राहणाऱ्या एका महिलेने पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल केली.
हेही वाचा : जैन समाजाकडून राज ठाकरेंना लेखी माफीनामा, शिवतीर्थवर काय घडलं?
तक्रारीनुसार, पहाटे सुमारे 3.23 वाजता एक अज्ञात तरुण घराची भिंत ओलांडून आत शिरला आणि अंगणात वाळत घातलेले महिलांचे अंतर्वस्त्र व सलवार चोरून पळून गेला. ही संपूर्ण घटना घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडिओ नंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.
हेही वाचा : “धाराशिव लोकसभा मतदारसंघात 4.5 लाख मुस्लिम मतदार", अर्चना पाटील नेमकं काय म्हणाल्या?










