बाप कसला हा तर कसाई! 'त्या' एका कारणावरून 12 वर्षाच्या मुलाची केली हत्या, पत्नीची पोलीस ठाण्यात धाव अन्...
Crime news : एका अल्पवयीन मुलावर त्याच्याच वडिलांनी कौटुंबिक वादातून मारहाण करत हत्या केल्याची मन हेलावून टाकणारी घटना आहे. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
वडिलांनी 'त्या' कारणावरून मुलाचीच केली हत्या
पत्नीने पतीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केली दाखल
Crime news : एका अल्पवयीन मुलावर त्याच्याच वडिलांनी कौटुंबिक वादातून मारहाण करत हत्या केल्याची मन हेलावून टाकणारी घटना आहे. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. संबंधित घटना मानेर पोलीस ठाणे परिसरातील शेरपूर गावात घडली असल्याचे सांगण्यात येत आहे. महिलेनं तिच्या पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. संबंधित प्रकरणात पोलिसांनी चार आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. ही घटना पाटणाजवळील मानेर येथे शुक्रवारी घडली आहे. या घटनेनं परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.
हे ही वाचा : नागपूर हादरलं! नराधमांनी 13 वर्षीय मुलीला OYO हॉटेलवर नेत लैंगिक शोषण केलं, नंतर व्हिडिओ रेकॉर्ड करत...
दरम्यान, अर्धवट जळाळेला मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेरपूर येथील रहिवासी संतोष राय यांचे दोन दिवसांपूर्वी पत्नीशी वादंग निर्माण झाला होता. तेव्हा रागाच्या भरातच त्यांची पत्नी घर सोडून गौरैया स्थान या तिच्या माहेरी गेली.
वडिलांकडून मुलाला बेदम मारहाण आणि प्रिन्सचा मृत्यू
वडिलांनी त्यांच्या 12 वर्षांचा मुलगा प्रिन्सला बेदम मारहाण केली. शुक्रवारी उपचारादरम्यान, प्रिन्सचा मृत्यू झाला. वडील त्यांच्या कुटुंबासह मुलाचे अंतिम संस्कार करत होते. मुलाच्या मृत्यूची माहिती मिळताच महिलेनं आपल्या सासरी धाव घेतली.
हे ही वाचा : हेडफोन लावून दोघांच्या डोक्यात सुरु होतं रीलचं खूळ, अहमदाबाद एक्सप्रेसने दिली धडक, दोघांचाही मृत्यू... जळगावात हळहळ
पतीविरोधात पत्नीकडून पोलीस ठाण्यात तक्रार
त्यानंतर पत्नीने आपल्या पतीविरोधात मणेर पोलीस ठाण्यात आपल्या मुलाची हत्या केल्याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी मुलाचे अंत्यसंस्कार करणारे सिंग राय, ओम प्रकाश, श्याम बाबू आणि राम बाबू यांनी अटक केली आहे. संबंधित प्रकरणाचा पुढील शोध सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.










