Delhi Builder Wife Murder: जिममध्ये मैत्री, भररस्त्यातच हत्या; मोबाइलमध्ये खुनाचं ‘राज’?

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

delhi dabri murder case women shot and accused suicide crime story
delhi dabri murder case women shot and accused suicide crime story
social share
google news

राजधानी दिल्लीतून (Delhi) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका बिल्डरच्या (Builder wife) पत्नीची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. या हत्येनंतर आरोपीने स्वत:वर देखील गोळी झाडून आत्महत्या केली आहे. रेनू गोयल 42 असे या मृत महिलेचे नाव आहे तर 23 वर्षीय आशिष असे या आरोपीचे नाव आहे. रेनू आणि आशिष हे दोघेही एकाच जीममध्ये जायचे आणि त्यांच्यात मैत्री असल्याची माहिती आहे. आता या मैत्रीतून आशिषने रेनूची हत्या का केली? याचा पोलीस तपास करत आहेत.पोलिसांनी या प्रकरणी दोघांचे मोबाईल फोन ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे.(delhi dabri murder case builder wife shot dead and accused suicide crime story)

नेमकं प्रकरण काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, दिल्लीच्या डाबडी परीसरात गोळी झाडून महिलेची हत्या करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सूरू केला होता. रेनू गोयल असे या मृत महिलेचे नाव आहे. या महिलेच्या घरासमोर तिची हत्या करण्यात आली होती. रेनूचे पती हे बिल्डर आहेत, तर ती हाऊसवाईफ होती. या दोघांनाही तीन मुले होती,अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

हे ही वाचा : Crime: मित्रासोबत संबंध…पत्नीने पतीचे कुऱ्हाडीने केले पाच तुकडे अन् फेकले कालव्यात

पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीची ओळख पटवली आहे.आशिष यादव 23 असे आरोपीचे नाव आहे.आशिष हा रेनूची हत्या करून घटनास्थळावरून फरार झाला होता.पोलिसांनी आरोपीचे पत्ता मिळून त्याच्या घरावर छापा टाकला होता. मात्र पोलीस घरी पोहोचण्याआधीच आरोपी आशिष यादवने स्वत:वर गोळी झा़डून आत्महत्या केली होती.पोलिसांनी यावेळी आरोपीने आत्महत्या करण्यासाठी वापरलेली बंदूक ताब्यात घेतली होती. आरोपीने याच बंदूकीतून रेनू हिची हत्या केल्याचेही तपासात समोर आले आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

आशिष आणि रेनू एकमेकांना अनेक वर्षापासून ओळखत होते.दोघांची भेट एका जीममध्ये झाली होती.या भेटीनंतर दोघामंध्ये घट्ट मैत्री झाली होती. पण या मैत्रीत नेमके असं काय घडलं की आशिषला रेनूची हत्या करावीशी वाटली? याचा पोलीस तपास करत आहेत.

दरम्यान पोलिसांनी या प्रकरणात आता घटनास्थळावरून सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. यासोबत रेनू आणि आशिष या दोघांचेही मोबाईल ताब्यात घेत तपास सुरु केला आहे. पोलीस या दोघांची कॉल डिटेल्स आणि व्हाट्सअॅप चॅट तापसणार आहे. या तपासातून आता पोलिसांची हाती काय सुराग लागतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहेत. त्याचसोबत बिल्डरच्या पत्नीच्या हत्येचे गुढ देखील उकलणार आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Pune Crime News : 12 वर्षाच्या मुलाला खायला लावली कबुतराची विष्टा

    follow whatsapp

    ADVERTISEMENT