Honeytrap : पत्नीच्या मैत्रिणीनेच न्यूड व्हिडिओ बनवून…; LIC एजंटसोबत काय घडलं?
पैसे परत मागितल्यावर तरुणीने एजंटला घरी बोलावून गोड बोलून दारू पाजली. त्यानंतर तरुणाचा न्यूड व्हिडिओ बनवला. यानंतर ब्लॅकमेलचा घाणेरडा खेळ सुरू झाला.
ADVERTISEMENT

Crime news in Marathi : गेल्या काही महिन्यांत हनीट्रॅपच्या अनेक घटना समोर आल्यात. डीआरडीओचा शास्त्रज्ञ असलेल्या प्रदीप करुलकरही असाच हनीट्रॅपमध्ये फसला. पण, ज्या घटनेबद्दल आपण जाणून घेणार आहोत, ती आहे एलआयसी एजंटची. या एजंटला हनीट्रॅप अडकवणारी तरूणी ही त्याच्याच पत्नीची मैत्रिणी होती.
प्रकरण आहे छत्तीसगडमधील बिलासपूर येथील. एका एलआयसी एजंटला त्याच्या पत्नीच्या मैत्रिणीने हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकवून मोठी रक्कम मागितली. पत्नीच्या मैत्रिणीने जमीन मिळवून देण्याचे आमिष दाखवत 11 लाख रुपये घेतले होते, मात्र जमीन दिलीच नाही.
तरुणीने कसं अडकवलं जाळ्यात
पैसे परत मागितल्यावर तरुणीने एजंटला घरी बोलावून गोड बोलून दारू पाजली. त्यानंतर तरुणाचा न्यूड व्हिडिओ बनवला. यानंतर ब्लॅकमेलचा घाणेरडा खेळ सुरू झाला. पीडित तरुणाकडूनच 12 लाख रुपयांची मागणी करण्यात आली.
वाचा >> ‘वाढदिवसाला भेट, प्रेम अन् बलात्कार’, मॉडेलने दाखवले व्हिडीओ
पैस न दिल्यास बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देण्यात आली. हे संपूर्ण प्रकरण वर्षभरापूर्वी घडल्याचे सांगण्यात आले, मात्र आता पीडित एजंटने पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे.