Crime : लिपस्टिकने सुसाइड नोट लिहली अन् नवविवाहितेने घेतला गळफास…
वैशाली जिल्ह्याच्या लालगंज परिसरात राहणाऱ्या काजल हिने आपल्या सासरच्याच घरी आत्महत्या केली. या आत्महत्येपुर्वी तिने आरशावर लिपस्टीकने सुसाईड नोट लिहली होती. या नोटमध्ये ती लिहते की, बाबा, मला माफ करा, मी तुमची चांगली मुलगी होते. बाबा, आय एम सॉरी,असा मॅसेज तिने आरशावर लिहला होता.
ADVERTISEMENT
देशभरात आत्महत्येच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. या मागची अनेक कारणे आहे. काही जण डिप्रेशन,आर्थिक विवंचनेतून, नैराश्यातून किंवा बेरोजगारीमुळे आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. आता अशीच एक घटना समोर आली आहे. या घटनेत एका नवविवाहितेने आत्महत्या केल्याची दुदैवी घटना घडली आहे. आरशावरून सुसाईड नोट लिहून तिने हे टोकाचं पाऊल उचललं आहे. विशेष म्हणजे या घटनेनंतर विवाहितेचे सासरचे कुटुंब फरार झाले होते.त्यामुळे नेमकी नवविवाहितेने आत्महत्या केली आहे की तिला आत्महत्या करण्यास भाग पाडले आहे, असा संशय आता व्यक्त होतोय. (married women commit suicide in written suicide note with lipstic in mirror vaishali bihar incident)
ADVERTISEMENT
सुसाईड नोटमध्ये काय?
वैशाली जिल्ह्याच्या लालगंज परिसरात राहणाऱ्या काजल हिचे अगरपूरच्या विक्कीशी लग्न झाले होते. या दोघांच्या लग्नाला अवघे 5 महिनेच झाले होते. म्हणजेच साधारण नवीन नवीनच लग्न होत. मात्र या दरम्यानच एक दुख:द घटना घडली. काजलने आपल्या सासरच्याच घरी आत्महत्या केली. या आत्महत्येपुर्वी तिने आरशावर लिपस्टीकने सुसाईड नोट लिहली होती. या नोटमध्ये ती लिहते की, बाबा, मला माफ करा, मी तुमची चांगली मुलगी होते. बाबा, आय एम सॉरी,असा मॅसेज तिने आरशावर लिहला होता. ही घटना उघडकीस होताच कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळलाय.
हे ही वाचा : चुकीचे इंजेक्शन अन् संशयास्पद मृत्यु, तरूणीसोबत नेमकं काय घडलं?
नेमकी आत्महत्या का केली?
काजलच्या आत्महत्येनंतर नेमके तिने असे टोकाचं पाऊल का उचलंल असा सवाल उपस्थित होतोय. पती बेरोजगार असल्याने घरात खर्चावरून नेहमी वाद व्हायचा, याच कारणामुळे तिने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. माझी मुलगी नवऱ्याच्या बेरोजगारीमुळे त्रासली होती, पण ती याबद्दल स्पष्टपणे काहिच सांगायची नाही, असे देखील काजलच्या आईने सांगितले आहे.
हे वाचलं का?
दरम्यान काजलच्या आत्महत्येनंतर तिच्या सासरचे कुटुंब फऱार झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेत पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. तसेच काजलच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिस तक्रार दाखल करून घेत आहेत. तसेच या प्रकरणात काजलच्या आत्महत्येनंतर सासरचे कुटुंब का फरार झाले आहेत? कुटुंबियांनी तिचा छळ केला होता का?, या छळाला कंटाळुन तिने आत्महत्या केली आहे का? याचा तपास आता पोलीस करतायत. सध्या य़ा घटनेने शहर हादरलं आहे.
हे ही वाचा : 17 वर्षाच्या वासनांध मुलीचा 2 अल्पवयीन मुलांवर बलात्कार, मुलीची आईही…
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT