'नवरा म्हणाला तू जावयासोबतच पळून जा, मी गेले पळून...', सासूचा 'तो' VIDEO आला समोर!
आपल्या होणाऱ्या जावयासोबत पळून जाणाऱ्या अनिताने पोलिसांना तिच्या अशा वागण्यामागचं कारण सांगितलं. हे सांगताना तिने तिच्या नवऱ्यावर टोमणे मारण्याचे आणि मारहाणीचे आरोप केले आहेत. अनिताने का केलं असं? पोलिसांसमोर झालं स्पष्ट
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
जावयासोबत पळून गेलेल्या सासूचं पोलिसांना उत्तर
पोलिसांना काय म्हणाली अनिता?
जावयासोबत पळून जाण्यामागचं नेमकं कारण काय?
Mother-in-law and Son-in-law Love Story: अलिगढ: अलिगढमधील जावई आणि सासूची लव्ह स्टोरी ही सध्या प्रचंड चर्चेत आहे. पळून गेलेले हे दोघेही आता थेट पोलिसांना शरण आले आहेत. पण त्यानंतर सासू अनिता हिने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. सध्या जावई राहुल आणि सासू अनिता हे पोलिसांच्या ताब्यात आहेत. याचदरम्यान, सासू अनिताचा एक व्हिडिओ हा समोर आला आहे. ज्यामध्ये ती म्हणतेय की, 'मला नवरा नेहमी म्हणायचा की, तू जावयासोबतच पळून जा. असे टोमणे रोज मारायचा. दररोज शिव्या ऐकाव्या लागत होत्या, म्हणून मी माझ्या होणाऱ्या जावयासोबत पळून गेले', असं रडत-रडत अनिताने पोलिसांना सांगितलं.
यापुढे ती तिचा पती जितेंद्रसोबत राहू शकणार नसल्याचंही तिने सांगितलं. कारण, वर्षानुवर्षे नवरा तिला मारत असल्याचा आरोप अनिताने केला आहे. ती म्हणाली, " मी पळून गेल्याची घटना तुम्हाला गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडसारखी वाटत असली तरी त्यामागे खुप दु:ख आणि वेदना आहेत."
200 रुपये आणि मोबाइल घेऊन पळाली
अनिता देवी यांनी पोलिसांना स्पष्ट सांगितले की, 'मी पैसे घेऊन पळून गेल्याचे माझ्यावर खोटे आरोप केले जात आहेत. मी फक्त 200 रुपये आणि माझा मोबाFल घेऊन घराबाहेर पडले होते. माझे कपडेसुद्धा व्यवस्थित नव्हते आणि त्यावेळी राहुलने मला आधार दिला.'
महिन्याला फक्त 1500 रुपये मिळत होते
पोलिसांना सांगताना अनिता म्हणाली, 'माझे पती जितेंद्र मला महिन्याला फक्त 1500 रुपये द्यायचे आणि त्याचा हिशोबसुद्धा द्यावा लागायचा. जर थोडे जास्त खर्च झाले तर टोमणे मारणे, शिवीगाळ करणे आणि मारहाण करणे, हे ठरलेलं होतं. मी माझ्या लग्नानंतर इतकी वर्षे घालवली, पण मला प्रेम कधीच मिळाले नाही. फक्त अपमान, मारहाण आणि टोमणे."










