Mumbai Jaipur Train Firing : कॉन्स्टेबल चेतनची पत्नी पोलिसांना भेटणार, कारण…

सौरभ वक्तानिया

ADVERTISEMENT

jaipur mumbai train shooting : Renu Singh told that her husband Chetan Singh is mentally unwell. She said that she would reach Mumbai on Saturday and would record her statement in front of the police officers.
jaipur mumbai train shooting : Renu Singh told that her husband Chetan Singh is mentally unwell. She said that she would reach Mumbai on Saturday and would record her statement in front of the police officers.
social share
google news

Jaipur Mumbai Train news : 31 जुलै रोजी मुंबई-जयपूर एक्स्प्रेसमध्ये गोळीबाराची घटना घडली. आरपीएफ कॉन्स्टेबल चेतन सिंगने एका आरपीएफ अधिकाऱ्यासह चार जणांची हत्या केली. चेतन सिंगची मानसिक स्थिती खराब असल्याचं सांगण्यात येतंय. याबद्दल त्याच्या पत्नीने इंडिया टुडेशी बोलताना काही महत्त्वाचे दावे केलेत. चेतनच्या पत्नीने सांगितले की, त्याची मानसिक स्थिती ठीक नाही आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. चेतन सिंगच्या मानसिक आरोग्याशी संबंधित कागदपत्रे घेऊन ती शनिवारी सकाळी मुंबईला जाणार आहे. (wife of RPF constable who fired in the train said – will give documents to the police)

‘इंडिया टुडे’शी फोनवर बोलताना रेणू सिंह यांनी सांगितले की, पती चेतन सिंग मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आहे. शनिवारी मुंबई येऊन पोलीस अधिकाऱ्यांसमोर जबाब नोंदवणार असल्याचे तिने सांगितले. याशिवाय चेतनच्या तब्येतीची कागदपत्रेही उपलब्ध करून दिली जाणार आहेत. रेणूने सांगितले की, सध्या ती उत्तर प्रदेशमध्ये आहे.

वाचा >> रत्नागिरी : बँकेतून निघाली पण…, आधी गँगरेप नंतर… मृतदेह बघून पोलिसही ‘शॉक’

रेणू म्हणाली, “हो, त्याची तब्येत खूप खराब होती. त्याच्यावर खूप दिवसांपासून उपचारही सुरू आहेत. औषधं द्यावी लागतील. चेकअपही करावं लागेल. इथं मथुरेत उपचार सुरू आहेत. त्याचं मानसिक संतुलन ठीक नव्हतं.”

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

वाचा >> Mumbai Tak Chavadi : जितेंद्र आव्हाडांनी कुणाला घाबरून दहीहंडी केली बंद?

चेतन सिंगच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, काही वर्षांपूर्वी तो घरी पडला होता. यादरम्यान त्याच्या मेंदूमध्ये रक्ताची गुठळी झाल्याचा दावा त्यांनी केला आहे आणि त्यामुळे तो मानसिक आजाराने ग्रस्त आहे. कुटुंबीयांनी सांगितले की, त्याच्या मानसिक अस्वस्थतेची कागदपत्रे, औषधोपचारासह सर्व काही आरपीएफच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना सांगितले आहे.

पत्नी रेणू चेतन सिंगला भेटू शकते

रेणू इतर नातेवाईकांसह शनिवारी सकाळी पती चेतनची वैद्यकीय कागदपत्रे घेऊन मुंबईत येणार आहे. पोलीस तपासाच्या दृष्टीने तिचा हा जबाब अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. रेणू तिच्या कुटुंबियांसमवेत येऊन पोलिसांना आपले म्हणणे देणार आहे. ती पोलीस कोठडीत आरोपी पती चेतन सिंग याला भेटण्याची शक्यता आहे.

ADVERTISEMENT

चेतनला 7 दिवसांची पोलीस कोठडी

पोलिसांनी आरोपी चेतनला 1 ऑगस्ट रोजी बोरिवली न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने आरोपीला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तो चौकशीत सहकार्य करत नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने इंडिया टुडेला सांगितले. गोळीबाराशी संबंधित प्रश्नांवर तो इकडची तिकडची उत्तरे देतोय आणि पोलिस कोठडीतही घोषणाबाजी करतोय, असे सुत्रांनी सांगितले.

ADVERTISEMENT

जयपूर एक्स्प्रेस ट्रेनमध्ये काय घडलेलं?

31 जुलै रोजी पहाटे 5 वाजता जयपूर-मुंबई एक्सप्रेस ट्रेनमध्ये गोळीबाराची घटना घडली होती. यामध्ये वरिष्ठ एएसआय टिकाराम मीणा यांच्याशिवाय आरपीएफ कॉन्स्टेबल चेतन सिंगने तीन प्रवाशांची गोळ्या झाडून हत्या केली. अब्दुल कादिर, असगर अब्बास शेख आणि सय्यद सैफुल्ला अशी या प्रवाशांची नावे आहेत.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT