Crime News : लोकांनी चिडवलं अन् आईच्या प्रियकराला संपवलं, 44 वर्षानंतर…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Crime news : Shankarlal Mali had an affair with Kalu's mother. Years ago, illegal relations were formed between the two.
Crime news : Shankarlal Mali had an affair with Kalu's mother. Years ago, illegal relations were formed between the two.
social share
google news

Crime News in Marathi : आईचे एका व्यक्तीशी अनैतिक संबंध असल्याचे कळलं. या संबंधावरून गावातील नागरिक चिडवत असल्याने त्याने आईच्या प्रियकरालाच संपवलं. ही घटना घडली 44 वर्षांपूर्वी म्हणजे 1979 साली. पण, या घटनेच्या तपासात पोलिसांना आता यश आलं आहे.

ADVERTISEMENT

ही घटना आहे राजस्थानातील बुंदीतील. राजस्थान पोलिसांनी तब्बल 44 वर्षांनंतर आरोपीला पकडले आहे. 1979 मध्ये शंकलाल माली नावाच्या व्यक्तीची हत्या करण्यात आली होती. शंकरलालची हत्या कालूने केल्याचा आरोप होता. पोलीस तेव्हापासून कालूचा शोध घेत होते. पण, पोलिसांना 44 वर्षे त्यांचा ठावठिकाणा लागला नाही.

वाचा >> अजित पवार एन्ट्री, शिंदे, फडणवीसांसह BJP च्या मंत्र्यांना बसणार मोठा फटका!

कालूला अटक करण्यासाठी पोलिसांनी जंग जंग पछाडले, मात्र तो सापडला नाही. त्यानंतर पोलिसांनी त्याची माहिती देणाऱ्याला 21 हजारांचे बक्षीसही जाहीर केले होते. त्याला मोस्ट वाँटेंड आरोपी म्हणूनही जाहीर करण्यात आले होते. तरीही पोलिसांना यश मिळत नव्हतं.

हे वाचलं का?

44 वर्षांनंतर पोलिसांना आलं यश

1979 मध्ये झालेल्या शंकरलाल मालीचा प्रकरणाचा तपास करत असलेल्या पोलिसांनी अखेर आरोपीला बेड्या ठोकल्या. त्याला दिल्लीतील वेल्डिंग दुकानात काम करत असतान पोलिसांनी अटक केली.

प्रकरण काय?

माहितीनुसार शंकरलाल मालींचे कालूच्या आईसोबत अफेअर होते. दोघांमध्येही अनैतिक संबंध असल्याची चर्चा गावातही होत होती. कालूच्या आजूबाजूच्या रहिवाशांनाही याची कल्पना होती. त्यामुळे गावातील लोक कालूला यावरून चिडवायचे.

ADVERTISEMENT

वाचा >> Crime News : “छगन भुजबळांना मारायची सुपारी मिळालीये, उद्या संपवणार”

आईचे शंकरलाल मालीसोबत असलेले अनैतिक संबंध कालूसाठी त्रासदायक ठरले होते, कारण सगळे त्याला त्याला त्यावरून चिडवायचे. सतत हेच चालू राहिल्याने कालूने एके दिवशी शंकरलाल मालीची हत्या केली. कालूने चाकूने वार करत हत्या केली आणि घटना स्थळावरून फरार झाला होता.

ADVERTISEMENT

कालू पोहोचला दिल्लीत

हत्येनंतर कालू राजस्थान सोडून दिल्लीत पोहोचला. दिल्लीत आश्रय घेतल्यानंतर त्याने नव्याने आयुष्य सुरू केले. उदरनिर्वाह चालवण्यासाठी त्याने दिल्लीतील एका दुकानात काम सुरू केले. 44 वर्षांपासून वेल्डिंगच्या दुकानात काम करायचा. आता प्रकरणात त्याची चौकशी केली जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक जय यादव यांनी दिली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT