Antilia bomb scare प्रकरणाची दोन वर्ष… लवकरच येणार वेब सीरिज?
मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली कार सापडल्याच्या (Antilia bomb scare) प्रकरणाला आज (२५ फेब्रुवारी) दोन वर्षे पूर्ण झाले. या दोन वर्षांमध्ये या प्रकरणात अनेक महत्वाच्या व्यक्ती अडकल्या होत्या, अनेक महत्वाचे आणि धक्कादायक खुलासे झाले. या प्रकरणाने महाराष्ट्राच्या राजकारणाला मोठी कलाटणी दिली होती. आता या प्रकरणावर एक थ्रिलींग वेब […]
ADVERTISEMENT
मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली कार सापडल्याच्या (Antilia bomb scare) प्रकरणाला आज (२५ फेब्रुवारी) दोन वर्षे पूर्ण झाले. या दोन वर्षांमध्ये या प्रकरणात अनेक महत्वाच्या व्यक्ती अडकल्या होत्या, अनेक महत्वाचे आणि धक्कादायक खुलासे झाले. या प्रकरणाने महाराष्ट्राच्या राजकारणाला मोठी कलाटणी दिली होती. आता या प्रकरणावर एक थ्रिलींग वेब सिरीज बनविण्याची तयारी सुरु झाली आहे. (Two years have passed since today (February 7) after the explosive car was found outside the Antilia residence of industrialist Mukesh Ambani.)
यापूर्वी या विषयाशी साधर्म्य असलेलं ‘CIU : Criminals in Uniform’ हे सुप्रसिद्ध पुस्तक संजय सिंग आणि राकेश त्रिवेदी या शोध पत्रकारांच्या जोडीने लिहिले आहे. जगप्रसिद्ध प्रकाशक ‘हार्पर कॉलिन्स’ हे या पुस्तकाचे प्रकाशक आहेत. कायदेशीर अडचण टाळण्यासाठी प्रकाशक सातत्याने ही काल्पनिक कथा सांगत असले, तरी प्रत्यक्षात ही कथा सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्हाला ती कोणत्या घटनेवर आधारित आहे याचा अंदाज देते.
अशातच ‘बॉम्बे स्टॅन्सिल’ प्रॉडक्शन कंपनीने ‘हार्पर कॉलिन्स’ प्रकाशनासोबत या पुस्तकाच्या ऑडिओ व्हिज्युअल अधिकारांसाठी करार केला आहे. ‘हार्पर कॉलिन्स’ने प्रसिद्धीपत्रक जारी करून याबाबत माहिती दिली. यामुळेच ‘CIU: क्रिमिनल्स इन युनिफॉर्म’ वर आधारित क्राइम थ्रिलर वेब सिरीज बनविण्याची तयारी सुरु झाली असल्याची माहिती आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
Antilia Bomb scare : ‘जैश उल हिंद’च्या धमकीचा रिपोर्ट परमबीर सिंहांनीच तयार करून घेतला
अमिताभ बच्चन – अजय देवगण स्टार्टर चित्रपट ‘रनवे 34’ आणि ‘खुदा हाफिज चॅप्टर 2’ चे सह-निर्माते, या पुस्तकातील माहितीबाबत एका आघाडीच्या OTT प्लॅटफॉर्मशी अंतिम चर्चा करत आहेत. बॉम्बे स्टॅन्सिलचे दुष्यंत सिंग हे ‘बरोट हाऊस (२०१९)’, ‘परचाई: घोस्ट स्टोरीज बाय रस्किन बाँड (२०१९)’ आणि ‘अभय (२०१९)’ च्या क्रिएटिव्ह टीमचा भाग म्हणूनही ओळखले जातात.
ADVERTISEMENT
“सीआययू ही कथा रहस्यांनी भरलेली आहे, अनेक ट्विस्ट, वळणांसह ही एक थ्रिलर कथा आहे. शोध पत्रकारितेतील दोन लेखकांच्या समृद्ध अनुभवाचे यातील योगदान महत्त्वाचे आहे. आम्हाला खात्री आहे की एक यशस्वी वेब सिरीज बनविण्यासाठी या कथेमध्ये सर्व क्षमता आहेत. आम्ही या प्रोजेक्टबद्दल खूप उत्सुक आहोत. लवकरच आम्ही एका प्रसिद्ध OTT प्लॅटफॉर्म आणि अनुभवी दिग्दर्शकाच्या असोसिएशनची घोषणा करू, अशी माहिती निर्मात्यांनी दिली.
ADVERTISEMENT
Antilia bomb scare: Manuskh Hiren च्या हत्येसाठी आरोपींना तब्बल 45 लाखांची सुपारी- NIAचा दावा
सध्या हे प्रकरण कोणत्या टप्प्यावर आहे?
सध्या या प्रकरणाची उच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. न्यायालयात नुकत्याच झालेल्या एका सुनावणीदरम्यान या प्रकरणातील तपास यंत्रणा एनआयएच्या तपासावर नाराजी व्यक्त करत या अन्य काही संशयितांच्या भूमिकेवर तपास यंत्रणा गप्प का आहेत? या घटनेला दोन वर्षे उलटून गेल्यानंतरही एनआयएला स्फोटकांनी भरलेली कार अँटिलियासमोर उभी करण्यामागे सचिन वाझे आणि इतर आरोपींचा हेतू काय होता? सचिन वाझे हा खरोखरच या संपूर्ण कटाचा सूत्रधार आहे की केवळ एक प्यादा? असे सवाल विचारले होते. दरम्यान, या सर्व प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर, लवकरच OTT प्लॅटफॉर्मवर हे प्रकरण पहावयास मिळण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT