क्रुरतेचा कळस गाठणाऱ्याचा एन्काऊंटर, ट्रेनमध्ये महिला कॉन्स्टेबलची केली होती हत्या
सरयू एक्स्प्रेसमध्ये बसण्याच्या जागेवरून वाद होऊन महिला कॉन्स्टेबलची क्रुरपणे हत्या करण्यात आली होती. त्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी दोनशे गावांतून पथके पाठवली होती. मात्र आरोपी सापडले नव्हते. त्यातील मुख्य आरोपीची आज पोलिसांनी एन्काऊंटर केला असून त्याच्या दोन साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे.
ADVERTISEMENT
UP Crime : ऑगस्ट महिन्यामध्ये सरयू एक्स्प्रेसमध्ये (saryu express) बसण्याच्या जागेवरुन वाद झाल्यानंतर महिला कॉन्स्टेबलवर (lady constable) तिघांनी प्राणघातक (attack) केला होता. त्या हल्ल्यातील तो मुख्य आरोपी पोलिस आणि एसटीएफच्या चकमकीत ठार झाला आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. अयोध्येतील (Uttar Pradesh Ayodhya) पुरा कलंदरमध्ये झालेल्या या चकमकीत मुख्य आरोपी अनीस ठार झाला असून पुढील तपास पोलीस करत आहेत. पोलिस आणि एसटीएफबरोबर झालेल्या चकमकीत हल्ला करणारा आरोपी ठार झाला असून त्याच्या दोन साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे. (uttar pradesh ayodhya police encounter lady constable murdered Saryu Express, two accused caught)
ADVERTISEMENT
जे दोन साथीदार पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. तेही सध्या जखमी झाल्याचे सांगण्यात आले आहे. याप्रकरणी ताब्यात घेतलेल्या आरोपींची आझाद आणि विशंभर दयाल उर्फ लल्लू अशी नावं आहेत. पोलिसांनी ज्याला ठार केले आहे त्या आरोपीकडून ट्रेनमधील महिला कॉन्स्टेबलचा विनयभंग करण्यात आला होता. ट्रेनमध्येच महिला कॉन्स्टेबलवर हल्ला करुन तिला मारहाण करण्यात आला होता. त्या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली होती. त्यानंतर पोलिसांना
हे ही वाचा >> Rain Update: राज्यभरात पुन्हा बरसणार, तरीही पावसाची तूट कायम
हल्ला करुन रेल्वेतून पसार
महिला कॉन्स्टेबलवर हल्ला करुन तिला रेल्वेतून खाली फेकण्यात आले होते. त्यानंतर रेल्वेचा वेग कमी झाल्यानंतर हल्लेखोरांनी चालत्या ट्रेनमधून उड्या टाकून पळून गेले होते. त्यानंतर पोलिसांनी कसून चौकशी करुन हल्लेखोराचा शोध चालू केला होता. त्यानंतर उत्तर प्रदेशाच्या एसटीएफ णि अयोध्या पोलिसांकडून आरोपींचा शोध घेऊन हल्ला करणाऱ्याला पोलिसांनी ठार केले आहे. तर या प्रकरणातील दोघांना अटक केली आहे.
हे वाचलं का?
माहिती देणाऱ्यांना एक लाख
सरयू एक्स्प्रेसमध्ये सुलतानपूरमध्ये तैनात असलेल्या महिला कॉन्स्टेबलवर बसण्याच्या वादावरून तिच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिस पथकाला देण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मानकापूरहून अयोध्येकडे येणाऱ्या दीडेशहून अधिक लोकांची चौकशी केली होती. त्यावेळी पोलिसांनी हल्लेखोरांच माहिती देणाऱ्यांना एक लाख रुपयांचे बक्षीस पोलिसांनी जाहीर केले होते.
हल्लेखोरांसाठी 200 गावात पथकं
महिला कॉन्स्टेबलवर हल्ला केल्यानंतर एसटीएफ आणि पोलिसांकडून हल्लेखोरांची कसून चौकशी करण्यात आली. याप्रकरणी अडीचशे पेक्षाही जास्त संशयितांची पोलिसांनी चौकशी केली होती. हल्लेखोर सापडले नसल्यामुळे पोलिसांनी मानकापूर ते अयोध्या दरम्यान सुमारे 200 गावांमध्ये पोलिसांची पथके पाठवून हल्लेखोराचा शोध घेण्यात आला होता.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> कांदा महागणार ! व्यापाऱ्यांनी पुकारला बेमुदत संप, नेमक्या मागण्या काय?
न्यायालय रात्री उघडले
हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर मात्र न्यायालयानेही हल्ल्याचे गांभीर्य ओळखून अलाहाबाद उच्च न्यायालयाने दखल घेऊन विशेष सुनावणीसाठी न्यायालय रात्री उघडण्यात आले होते. तर न्यायमूर्तींनी आपल्या घरीच खंडपीठ स्थापन केले होते. त्यानंतर न्यायालयाकडून रेल्वे आणि सरकारला खडे बोल सुनावले होते. त्यावेळी पोलिसांनी कारवाई काय केली असा सवाल न्यायालयाकडून उपस्थित करण्यात आला होता. महिला कॉन्स्टेबलवर हल्ला झाल्यानंतर रात्री उशिरा बोलावलेल्या विशेष खंडपीठात सरन्यायाधीशांनी तीव्र नाराजी व्यक्त करत राज्य सरकार आणि रेल्वे प्रशासनाला नोटीस बजावली होती. त्यानंतर या प्रकरणाच्या सुनावणीसाठी पुन्हा वेळ देण्यात आली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT