चोरुन काढला दीर अन् वहिणीचा आक्षेपार्ह व्हिडिओ, नंतर गावातील दोघांची 'ती' मागणी; पुढं काय घडलं?

मुंबई तक

पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गावातीलच दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. पीडितेचा नवरा ट्रक ड्रायव्हर असून तो कामाच्या निमित्ताने अनेकदा घराबाहेर असतो, याचाच फायदा घेत आरोपींनी हे कृत्य केले आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

चोरुन काढला दीर अन् वहिणीचा आक्षेपार्ह व्हिडिओ

point

नंतर गावातील दोघांची 'ती' मागणी

point

पुढं काय घडलं?

Crime News : एका महिलेला तिच्या आक्षेपार्ह व्हिडिओच्या माध्यमातून ब्लॅकमेल करून दोन लाख रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गावातीलच दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. पीडितेचा नवरा ट्रक ड्रायव्हर असून तो कामाच्या निमित्ताने अनेकदा घराबाहेर असतो, याचाच फायदा घेत आरोपींनी हे कृत्य केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. उत्तर प्रदेशातील मथुरा परिसरातील ही घटना आहे.

दीरासोबतचा आक्षेपार्ह व्हिडिओ

पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, 28 फेब्रुवारी रोजी गावातील सद्दाम आणि इमरान नावाचे दोन तरुण तिच्या घरी आले. त्यांनी तिला मोबाईलवर तिचा आणि तिच्या दीराचा एक आक्षेपार्ह अवस्थेतील व्हिडिओ दाखवला. घराच्या मागील बाजूस असलेल्या खिडकीतून त्यांनी हा व्हिडिओ चोरून बनवल्याचा दावा आरोपींनी केला. हा व्हिडिओ संपूर्ण गावात व्हायरल करण्याची धमकी देत त्यांनी महिलेकडे दोन लाख रुपयांची मागणी केली. बदनामीच्या भीतीने पीडितेने घर बांधण्यासाठी साठवून ठेवलेले दोन लाख रुपये आरोपींच्या स्वाधीन केले.

हे ही वाचा : 'माझ्या मृत्यूनंतर तुला कोण सांभाळणार?' आधी केली लेकीची हत्या अन् मग आईने काय केलं बघा..

व्हिडिओ डिलीट केला नाही

पैसे घेतल्यानंतर व्हिडिओ डिलीट करण्याची विनंती पीडितेने केली होती, मात्र आरोपींनी तसे केले नाही. 10 मार्च रोजी आरोपींनी पुन्हा पीडितेच्या घरात घुसून आणखी एक लाख रुपयांची मागणी केली. पैसे नसल्याचे सांगितल्यावर त्यांनी तिच्या अंगावरील सोन्याची चेन आणि चांदीची कुंडले देण्याची जबरदस्ती केली. पीडितेने प्रतिकार केला असता झालेल्या गोंधळामुळे घरातील इतर सदस्य तिथे पोहोचले. नातेवाईकांना पाहून आरोपींनी शिवीगाळ करत आणि ठार मारण्याची धमकी देत तिथून पळ काढला.

हे ही वाचा : सांगली हादरली, आंतरजातीय लग्न, पण नवऱ्याचे तृतीयपंथीयासोबत संबंध; चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीची हत्या

अखेर पोलीसात धाव

नवरा घरी परतल्यानंतर पीडितेने हा सर्व प्रकार सांगितला. सुरुवातीला बदनामी टाळण्यासाठी पतीने सामोपचाराने हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपी जुमानत नसल्याने अखेर पोलिसांत धाव घेण्यात आली. शेरगड पोलीस ठाण्याचे प्रभारी अजय किशोर यांनी सांगितले की, पीडितेच्या अर्जावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके तैनात करण्यात आली आहेत. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
 

हे वाचलं का?