Crime : 11 वर्षाच्या मुलीवर नराधम डॉक्टरची पडली नजर, वासनांधाने रुग्णालयातच…
पोलीस ठाणे फेज-1 परिसरातील सेक्टर 8 मध्ये दवाखाना चालवणाऱ्या डॉक्टरने शेजारी राहणाऱ्या एका 11 वर्षीय मुलीला गुरुवारी (2 नोव्हेंबर) आपल्या दवाखान्यात बोलावून जबरदस्तीने बलात्कार केला.
ADVERTISEMENT
Uttar Pradesh Noida Crime News : सध्या भारतात गुन्हेगारी वाढत आहे. दिवसेंदिवस हत्या, आत्महत्या आणि बलात्काराची नवनवीन प्रकरणं मोठ्या प्रमाणात घडत आहेत. अशावेळी उत्तर प्रदेशमधील नोएडा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. (Uttar Pradesh Noida Crime News Doctor Raped Minor Girl In Clinic)
ADVERTISEMENT
पोलीस ठाणे फेज-1 परिसरातील सेक्टर 8 मध्ये दवाखाना चालवणाऱ्या डॉक्टरने शेजारी राहणाऱ्या एका 11 वर्षीय मुलीला गुरुवारी (2 नोव्हेंबर) आपल्या दवाखान्यात बोलावून जबरदस्तीने बलात्कार केला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. आरोपी डॉक्टर फरार असून, त्याच्या शोधासाठी पोलिसांची पथके तैनात करण्यात आली आहेत.
वाचा : Maratha Reservation : “मोदींच्या खिशात आरक्षणाची चावी, जरांगेंनी…”, ठाकरेंचे दहा सवाल
याबाबत पोलीस उपायुक्त (झोन I) हरीश चंद्र यांनी सांगितले की, ‘आरोपी डॉक्टर शहजाद (40 वर्षे) हा पोलीस स्टेशन फेज-1 परिसरातील सेक्टर 8 मध्ये त्याचा दवाखाना चालवतो. माहितीनुसार, त्याने शेजारी राहणाऱ्या एका 11 वर्षीय अल्पवयीन मुलीला आपल्या दवाखान्यात बोलावले आणि तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. हा प्रकार घडल्यानंतर डॉक्टरने मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन तेथून पळ काढला. नंतर पीडित मुलीने कुटुंबीयांना याची माहिती दिली.’
हे वाचलं का?
वाचा : Eknath Shinde: ‘जरांगेंची सरसकट आरक्षणाची मागणी नाही’, CM शिंदेंच्या विधानाने मोठा संभ्रम
पोलीस उपायुक्त हरीश चंद्र यांनी पुढे सांगितले की, ‘या प्रकरणी तातडीने कारवाई करत पोलिसांनी संबंधित कायद्यान्वये गुन्हा दाखल करून मुलीला वैद्यकीय तपासणी व उपचारासाठी रुग्णालयात पाठवले आहे.’
वाचा : Maratha Reservation: मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं अन् CM शिंदे म्हणाले, ‘आम्ही कोणाचीही…’
पोलिसांची तीन पथके तयार करून आरोपीच्या शोधासाठी पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल, असा दावा त्यांनी केला. या घटनेमुळे नोएडातील प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. हे वाईट कृत्य करणाऱ्या डॉक्टरला फाशीची शिक्षा देण्याची मागणी लोकांनी केली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT