whatsapp scam : लाईक्स आमिष अन् ठाण्यातील व्यक्तीने गमावले 37 लाख, तुम्ही ही चूक करू नका

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

the current job contract of a person living in Thane, Maharashtra is going to end soon, after which he shared his resume on the online recruitment portal.
the current job contract of a person living in Thane, Maharashtra is going to end soon, after which he shared his resume on the online recruitment portal.
social share
google news

Online scams news : घरापासून ते ऑफिसपर्यंत संवादाचा महत्त्वाचा दुवा बनलेलं व्हॉट्सअॅप प्रत्येकाच्याच मोबाईलमध्ये आहे. Whatsapp सध्या काळात आवश्यक माध्यम झालं आहे. पण, याच whatsapp चा आता घोटाळेबाज फायदा घेऊ लागले आहेत. ऑनलाइन माध्यमातून फसवणुकीचे एक नवीन प्रकरण समोर आले आहे. यामध्ये ठाण्यातील एका व्यक्तीला व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवून दररोज ठराविक रकमेची ऑफर दिली गेली आणि त्याच्या खात्यातून 37 लाख रुपये काढून घेण्यात आले. नेमकं हे प्रकरण काय हेच समजून घ्या…

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ठाणे शहरात राहणाऱ्या संबंधित व्यक्तीचा सध्याचा जॉब कॉन्ट्रॅक्ट लवकरच संपणार आहे. त्यामुळे त्याने ऑनलाइन रिक्रूटमेंट पोर्टलवर आपला बायोडाटा शेअर केला आहे. यानंतर त्या व्यक्तीला इन्स्टंट मेसेजिंग अॅपवर एका अनोळखी नंबरवरून मेसेज आला. या मेसेजमध्ये नवीन नोकरीची ऑफर होती आणि ही नोकरी अर्धवेळ होती.

90 हजार रुपयांपर्यंत कमावण्याची दिली ऑफर

तक्रार व्यक्तीला या अर्धवेळ नोकरीत दररोज 2000 ते 3000 रुपये कमावण्याची संधी मिळेल, असे आमिष दाखवण्यात आले. त्यावरून ही व्यक्ती महिन्याला 90,000 रुपयांपर्यंत कमवू शकते असे सांगितले गेले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

वाचा >> Jaipur Mumbai Train Firing : जवानाने चौघांवर गोळ्या का झाडल्या? ते लोक कोण?

ऑनलाइन गंडा घालणाऱ्यांनी काय काम दिलं?

whatsapp वरून मेसेज पाठवल्यानंतर गंडा घालणाऱ्यांनी ठाण्यातील व्यक्तीला सांगितले की, पार्ट टाइम जॉबमध्ये यूजर्सला इंस्टाग्रामवर सेलिब्रिटींचे फोटो लाईक करावे लागतील. एका लाईकवर 70 रुपये दिले जातील. यासाठी प्रत्येक लाईकचे स्क्रीनशॉट शेअर करावे लागतील. संबंधित व्यक्तीचा यावर विश्वास बसावा म्हणून सुरूवातीला काही लाईक्सचे 210 रुपये दिले गेले.

टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील झाले अन्…

यानंतर, संबंधित व्यक्तीला टेलिग्राम ग्रुपमध्ये जोडण्यात आले. यानंतर या व्यक्तीला जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून क्रिप्टोकरन्सी खरेदी करण्यास सांगितले. ठाण्यातील व्यक्तीने सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला 9,000 रुपये गुंतवले आणि त्याला 9,980 रुपयांचा परत मिळाले. जास्त पैसे मिळत असल्याचा विश्वास बसल्यानंतर या व्यक्तीने आणखी पैसे गुंतवले. त्यानंतर व्हीआयपी खात्याचा दर्जा दिल्यानंतर त्याला आणखी पैसे गुंतवण्यास सांगितले गेले.

ADVERTISEMENT

वाचा >> Sambhaji Bhide : महात्मा फुलेंना शिव्या, साईबाबांना म्हणाले ‘भड@#’, भिडे बरळले

37 लाख रुपयांचे नुकसान झाले

पुढे तक्रारदार व्यक्तीने सुमारे 37 लाख रुपये गुंतवले. यानंतर घोटाळेबाजांनी कोणतेही पैसे परत दिले नाही. आपली फसवणूक झाल्याचं या व्यक्तीच्या लक्षात आले. त्यानंतर त्याने लगेच पोलीस ठाण्यात धाव घेतली. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT