फ्लॅटमध्ये सापडला महिला इंजिनियरचा मृतदेह, धक्कादायक माहिती आली समोर

मुंबई तक

ADVERTISEMENT

bihar murder case
bihar murder case
social share
google news

Crime News: जलसंपदा विभागात  नोकरी करणाऱ्या 29 वर्षाच्या महिला अभियंता महिमा कुमारी (Mahima Kumari) हिचा मृतदेह (Deadbody) तिच्या बेडरूममध्ये आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ही महिला अभियंता (engineer) गेल्या दोन वर्षांपासून भाडोत्री फ्लॅटमध्ये एकटीच राहत होती. तिच्या मृतदेहाबाबत  माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे.

घडलेल्या घटनेबद्दल माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, 'ही घटना शनिवारी रात्री उशिरा घडली होती, 29 वर्षाच्या असलेली ही महिमा कुमारी शनिवारी त्या आपल्या ऑफिसमध्ये गेल्याच नाहीत. 

त्यामुळे त्यांच्या सहकाऱ्यांनी महिला यांना फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांचा फोन लागलाच नाही. त्यामुळे त्यांच्या एका सहकाऱ्याने आपल्या पत्नीला त्यांच्या फ्लॅटवर जाण्यास सांगितले. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> वेबलिंक, फोटो आणि लॉज, सेक्स रॅकेटचा झाला पर्दाफाश


सहकाऱ्याची पत्नी ज्यावेळी महिमा कुमारीच्या फ्लॅटवर पोहचली तेव्हा महिला कुमारीच फ्लॅटवरचं चित्र पाहून तिला धक्काच बसला. कारण फ्लॅटचा दरवाजा उघडा होता, आणि बेडरूममध्ये महिमाचा मृतदेह पडला होता. 


समोरील दृश्य पाहून तिने आरडाओरड केला. त्यानंतर आजूबाजूचे लोक तिथे जमा झाले. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेहाची पाहणी करून महिला कुमारी यांच्या कुटुंबीयांनी घडलेल्या घटनेची माहिती देण्यात आली.   

ADVERTISEMENT

महिला कुमार यांच्या मृत्यूनंतर त्या परिसरात खळबळ उडाली आहे. तर बघ्यांचीही गर्दी जमली होती. 

ADVERTISEMENT

घडलेल्या घटनेनंतर आजूबाजूच्या लोकांची पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली असून आरोपीला लवकरच ताब्यात घेण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केले. 

महिमा कुमारी या बिहारमधील लखीसरायच्या माननपूर बाजारपेठे येथील रहिवासी होती. त्या गेल्या दोन वर्षांपासून प्रजापतीनगरमध्ये भाडोत्री फ्लॅट घेऊन राहत होत्या. त्या राहत असलेल्या फ्लॅटमध्ये  त्यांचे आजी-आजोबा आणि घरातील इतर सदस्यही त्यांच्याकडे येऊन राहत होते.

हे ही वाचा >> मृत्यूवर मात करणारा शिंदेचा ढाण्या वाघ; महेश गायकवाड परतले कल्याणात!

    follow whatsapp

    ADVERTISEMENT