Crime : लाखात पगार, घरी सुरळीत…; तरीही उच्चशिक्षित तरुणानं संपवलं आयुष्य

मुंबई तक

Pune | Pimpri-Chinchwad crime news : पिंपरी-चिंचवड : सर्व काही सुरळीत सुरु असूनही कशातच मन लागतं नाही म्हणून उच्चशिक्षित तरुणाने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं. पिंपरी-चिंचवडमधील चिखलीत येथे शनिवारी सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना समोर आली. विरेन जाधव (२७) असं आत्महत्याग्रस्त तरुणाचं नाव आहे. राहत्या सोसायटीच्या अकराव्या मजल्यावरून उडी घेऊन त्याने आत्महत्या केली. या घटनेनंतर विरेनच्या […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Pune | Pimpri-Chinchwad crime news :

पिंपरी-चिंचवड : सर्व काही सुरळीत सुरु असूनही कशातच मन लागतं नाही म्हणून उच्चशिक्षित तरुणाने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं. पिंपरी-चिंचवडमधील चिखलीत येथे शनिवारी सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना समोर आली. विरेन जाधव (२७) असं आत्महत्याग्रस्त तरुणाचं नाव आहे. राहत्या सोसायटीच्या अकराव्या मजल्यावरून उडी घेऊन त्याने आत्महत्या केली. या घटनेनंतर विरेनच्या आई-वडिलांना मोठा धक्का बसला असून त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. (Youth commits suicide by jumping from eleventh floor in Pimpri-Chinchwad)

दरम्यान, याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, विरेन उच्चशिक्षित होता. एका नामांकित कंपनीमध्ये तो पर्मनंटही झाला होता. यात त्याला किमान एक लाखाच्या घरात पगार होता. घरीही सगळं काही नीटनेटकं होतं. पण या सगळ्यात मन लागतं नाही, आनंद नाही, त्यामुळे आयुष्यात आलेल्या नैराश्यातून आत्महत्या केल्याचं सांगण्यात येतं आहे. याबाबत त्याच्या डायरीतही उल्लेख आढळला आहे.

Supreme Court वर सरकारचा दबाव आहे का? सरन्यायाधीशांनी उदाहरणासह सांगितलं सत्य…

हे वाचलं का?

    follow whatsapp