Lok Sabha : ठाकरेंना झटका की राज-शिंदेंना घेऊन फडणवीस फसले?
India Today-Axis My India Exit Poll : एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, लोकसभेच्या जागा आणि मतांची टक्केवारी पाहता या दोन्ही बाबतीत NDA महाराष्ट्रातही इंडिया आघाडीवर मात करताना दिसत आहे. पण फरक इतका कमी आहे की, दोघांमध्ये फारसा फरक उरला आहे असे वाटत नाही. एक्झिट पोलनुसार, एनडीएला महाराष्ट्रात 28 ते 32 जागा मिळण्याची अपेक्षा आहे.
ADVERTISEMENT
India Today-Axis My India Exit Poll Uddhav Thackeray Shiv Sena : लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंचं निवडणुकीत पाडण्यासाठी भाजपने अनेक प्रयत्न केले. पहिलं तर शिवसेनेत फुट पाडली गेली त्यांनंतर पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला मिळालं. इतकं करूनही भाजपने ठाकरेंची (Uddhav Thackeray) मराठी मते फोड़ण्यासाठी मनसेला सोबत घेतलं.त्यामुळे भाजपने शिंदे (Eknath Shinde) आणि राज ठाकरेंना (Raj Thackeray) सोबत घेऊन ठाकरेंना लोकसभेतून पराभूत करण्यासाठी केलेल्या प्रयत्नाना नेमकं किती यश आलं आहे. हे एक्झिट पोलच्या अंदाजानुसार जाणून घेऊयात. (india today axis my india exit poll maharashtra lok sabha 2024 udhhav thackeray shiv sena eknath shinde shiv sena devendra fadnavis bjp maharashtra lok sabha)
ADVERTISEMENT
India Today-Axis My India च्या एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 9 ते 11 जागा मिळण्याचा अंदाज आहे. त्यामुळे एक्झिट पोलवरून स्पष्ट होतंय की, भाजपचं शिंदे आणि राज ठाकरेंना यांना सोबत घेऊन उद्धव ठाकरेंना पराभूत करण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला आहे. आणि सहानुभूतीचा फँक्टर उद्धव ठाकरेंना तारून गेल्याचं स्पष्ट होतं आहे.
हे ही वाचा : India Today Exit Poll : शिंदेंची शिवसेना महाराष्ट्रात 'या' जागा जिंकणार?
मतांची टक्केवारी काय सांगते?
एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, लोकसभेच्या जागा आणि मतांची टक्केवारी पाहता या दोन्ही बाबतीत NDA महाराष्ट्रातही इंडिया आघाडीवर मात करताना दिसत आहे. पण फरक इतका कमी आहे की, दोघांमध्ये फारसा फरक उरला आहे असे वाटत नाही. एक्झिट पोलनुसार, एनडीएला महाराष्ट्रात 28 ते 32 जागा मिळण्याची अपेक्षा आहे आणि मतांची टक्केवारी 46 टक्के असू शकते. इंडिया ब्लॉकला 16 ते 20 जागा मिळण्याची अपेक्षा आहे, ज्यांचे मताधिक्य 43 टक्क्यांपर्यंत असू शकते, असा अंदाज आहे.
हे वाचलं का?
दरम्यान भाजपबद्दल बोलायचे झाले तर 2019 मध्ये 23 जागा जिंकणाऱ्या भाजपला यावेळी केवळ 22 जागा जिंकण्यात यश मिळू शकण्याचा अंदाज आहे. एक्झिट पोलनुसार, 2019 मधील 27.8 टक्क्यांवरून भाजपच्या मतांची टक्केवारी किंचित वाढून 29 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. परंतु जागांच्या बाबतीत त्यांचे नुकसान होत आहे.
हे ही वाचा : Lok Sabha : निकालाआधीच ठाकरेंना झटका, निवडणूक आयोग कारवाई करणार?
उद्धव ठाकरेंना मतांच्या प्रमाणात फारच किरकोळ नुकसान सहन करावे लागले आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंना 23.5 टक्के मते मिळाली होती, तर एक्झिट पोलमध्ये हा आकडा 20 टक्के आहे. केवळ 3.5 टक्के नुकसान, जे निवडणुकीपूर्वी झालेल्या नुकसानाच्या तुलनेत काहीच नाही.
ADVERTISEMENT
महाराष्ट्रातही काही महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत आणि त्याच उत्साहात उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या रस्त्यावर उतरले तर निकाल धक्कादायक असू शकतात. उद्धव ठाकरे यांना त्यांच्या राजकीय शत्रूंकडून निवडणुकीत बदला घ्यायचा असेल, तर विधानसभा आणि महापालिकाच्या निवडणुका या उत्तम संधी असणार आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT