Sharad Pawar : पराभूत सुजय विखेंना पवारांचा चिमटा, इंग्रजीवरून सुनावले खडेबोल

मुंबई तक

Sharad Pawar News : निवडणुकीत कोणीतरी म्हटलं होतं इंग्रजी बोलता येत नाही. पण इंग्रजीत बोलायला लागतं असं काही नाही. तुम्ही हिंदीत बोलू शकता, मातृभाषेत बोलू शकता, मराठीतह बोलू शकता. पण निलेश लंके एकदा माईक हातात घेतला की मराठीत काय बोलतील याचा भरोसा नाही, असे देखील शरद पवार म्हणाले आहेत.

ADVERTISEMENT

आमचे हे सहाही खासदार तुमची सेवा चांगल्या दृष्टीने करतील अशी मी अपेक्षा करतो.
sharad pawar slams sujay vikhe patil on english speech in parliment nilesh lanke ahmednagar sabha news
social share
google news

Sharad Pawar On Sujay Vikhe Patil : निवडणुकीत कोणीतरी म्हटलं होतं इंग्रजी बोलता येत नाही. पण इंग्रजीत बोलायला लागतं असं काही नाही. तुम्ही हिंदीत बोलू शकता, मातृभाषेत बोलू शकता, मराठीत बोलू शकता, अशा शब्दात शरद पवारांनी भाजपचे पराभूत उमेदवार सुजय विखेंना चिमटा काढला आहे. (sharad pawar slams sujay vikhe patil on english speech in parliment nilesh lanke ahmednagar sabha news) 

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आज रौप्य महोत्सवी कार्यक्रम अहमदनगरमध्ये पार पडला. या कार्यक्रमातून बोलताना शरद पवार यांनी तुफान भाषण केलं. खरं सांगायचं झालं तर निलेश लंके लोकसभेत आल्यानंतर मला काळजी एकाच गोष्टीची आहे,जे 80 सभासद आहेत, ते सगळे जुने सभासद आहेत. त्यांना पारनेरमधून सगळेजण नक्की विचारतील. हा कोण गडी या ठिकाणी आणला? शरद पवार असे बोलताच कार्यक्रमात एकच हशा पिकला होता.

हे ही वाचा : ''या कारणामुळे आम्ही हरलो''; शेलारांचे 'मुंबई TaK चावडी'वर स्पष्ट उत्तर

शरद पवार पुढे म्हणाले, निवडणुकीत कोणीतरी म्हटलं होतं इंग्रजी बोलता येत नाही. पण इंग्रजीत बोलायला लागतं असं काही नाही. तुम्ही हिंदीत बोलू शकता, मातृभाषेत बोलू शकता, मराठीतह बोलू शकता. पण निलेश लंके एकदा माईक हातात घेतला की मराठीत काय बोलतील याचा भरोसा नाही, असे देखील शरद पवार म्हणाले आहेत. 

निलेश लंकेंना तुम्ही मोठ्या मतांनी निवडून दिलं, भगरे गुरुजींसारखा आदिवासी समाजातला एक शिक्षक अत्यंत साधा, आज जनतेने मोठ्या मताने निवडून दिला. मी नाशिक जिल्ह्याच्या जनतेचं, दिंडोरीतल्या भागातील जनतेचं मी अंतकरणापासून आभार मानतो. आणि आमचे हे सहाही खासदार तुमची सेवा चांगल्या दृष्टीने करतील अशी मी अपेक्षा करतो, असे शरद पवार यांनी म्हटलं आहे. 

हे ही वाचा : Modi Cabinet Portfolios: देशाचे नवे कृषी आणि आरोग्य मंत्री कोण? सगळी यादी जशीच्या तशी

हे वाचलं का?

    follow whatsapp