अभिनेत्री नुसरत भरूचाचा अपघात, टाकेही घातले!

अभिनेत्री नुसरत भरुचा सध्या 'छोरी 2' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. अभिनेत्रीचा सेटवर अपघात झाल्याची बातमी समोर येत आहे.
अभिनेत्री नुसरत भरूचाचा अपघात, टाकेही घातले!

अभिनेत्री नुसरत भरुचा सध्या 'छोरी 2' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. अभिनेत्रीचा सेटवर अपघात झाल्याची बातमी समोर येत आहे. कपाळावर काही टाके आले आहेत. यादरम्यान तिच्या मित्राने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये डॉक्टर नुसरतच्या कपाळावर टाके घेताना दिसत होते. बेडवर पडून नुसरत वेदनेने ओरडत होती.

या संपूर्ण घटनेदरम्यान नुसरत भरुचाची बेस्ट फ्रेंड इशिता राज तिच्यासोबत होती. इशिताने नुसरतचा हा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर शेअर केला आहे. नंतर नुसरतने ही पोस्ट तिच्या टाइमलाइनवर शेअर केली. कपाळावर येणाऱ्या टाकेमध्ये तू 'हॉट' दिसशील, असे इशिता व्हिडिओमध्ये नुसरतला समजावताना दिसली. भुवया जवळील कटमध्ये लोक चांगले दिसतात. तु पण छान दिसणार, असं तिची मैत्रीण तिला सांगत आहे.

या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, नुसरतला वेदना होत आहे आणि तिची मैत्रीण इशिता तिला समाजावत आहे. डॉक्टर देखील तिला समजावून सांगत आहेत की टाक्यांचे निशाण निघून जातील. नुसरत भरुचाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर तिने 2006 मध्ये 'जय संतोषी माँ' मधून पदार्पण केले. मात्र, 'लव्ह सेक्स और धोखा' आणि 'प्यार का पंचनामा'मधून तिला प्रसिद्धी मिळाली. त्याच बरोबर नुसरतने इशिता राजसोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. दोघेही बालपणीचे मित्र.

'प्यार का पंचनामा (2011)', 'प्यार का पंचनामा 2 (2015)' आणि 'सोनू के टीटू की स्वीटी (2018)' हे यापैकी काही चित्रपट आहेत. नुसरत 'छोरी 2'चे शूटिंग करत आहे. यात सोहा अली खानही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. विशाल फुरिया या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत. हा चित्रपट प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे. याआधी नुसरतचा 'छोरी' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता, तेव्हा तिला चांगला प्रतिसाद मिळाला होता.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in