Deepika Padukone: बाप्पाच पावला! रणवीर-दीपिका झाले आई-बाबा, घरी नव्या पाहुण्याचं आगमन
Ranveer Singh-Deepika Padukone: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने एका मुलीला जन्म दिला आहे. रणबीर आणि दीपिका आता आई-बाबा झाले आहेत.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने एका मुलीला जन्म दिला
रणवीर-दीपिका झाले आईबाबा
प्रसूतीपूर्वी दीपिकाने घेतले बाप्पाचे आशीर्वाद
Ranveer Singh-Deepika Padukone: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने एका मुलीला जन्म दिला आहे. रणबीर आणि दीपिका आता आई-बाबा झाले आहेत. गणेश चतुर्थीच्या खास मुहूर्तावर आता अभिनेत्री दीपिका पती रणवीर सिंगने ही गोड बातमी दिली आहे. दीपिकाने या वर्षी २८ फेब्रुवारीला प्रेग्नेंसीची घोषणा केली होती आणि ती सप्टेंबरमध्ये बाळाला जन्म देणार असल्याचे सांगितले होते. (ranveer singh and deepika padukone becomes parents blessed with baby girl)
दीपिकाचा हॉस्पिटलमधील व्हिडीओ व्हायरल होताच तिचे चाहते आनंदाची बातमी ऐकण्याची वाट पाहत होते. अखेर आता अभिनेत्रीने चाहत्यांच्या आनंदाची बातमी देत सर्वांना धक्का दिला आहे. अभिनेत्रीची डिलिव्हरीची तारीख या महिन्यात असल्याचे सांगण्यात आलं होतं. दीपिका व रणवीर यांनी आता त्यांच्या पहिल्या लेकीचे स्वागत केले आहे. दीपिका पदुकोण व रणवीर सिंग त्यांच्या कुटुंबासह मुंबईतील एच.एन. रिलायन्स हॉस्पिटलमध्ये आहेत.
हेही वाचा : Numerology: गणपती बाप्पाचा आवडता अंक! तुमचंही 'या' नंबरशी असू शकतं खास कनेक्शन
पापाराझी विरल भयानी यांनी एक पोस्ट शेअर केली असून रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी एका मुलीचे पालक झाले आहेत. रणवीर आणि दीपिकाचे कुटुंबीयही रुग्णालयात उपस्थित आहेत. गणपतीच्या आगमनाने दीपिका पादुकोणच्या आयुष्यात सुद्धा आनंद आला आहे. दीपिका पादुकोणला कन्यारत्न प्राप्त झाले आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
हेही वाचा : Ganesh Chaturthi 2024: राशीनुसार बाप्पाची करा 'अशी' विशेष पूजा, सर्व विघ्न होतील दूर!
प्रसूतीपूर्वी दीपिकाने घेतले बाप्पाचे आशीर्वाद
प्रसूतीपूर्वी दीपिका पदुकोण 6 सप्टेंबर रोजी पती रणवीर सिंगसोबत मुंबईच्या प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात पोहोचली होती. दोघंही हात धरून एकत्र दिसले होते. बाळाच्या जन्मापूर्वी दोघांनीही बाप्पाचे आशीर्वाद घेतले आणि आयुष्य बदलणाऱ्या या अविस्मरणीय क्षणाची तयारी सुरू केली.
ADVERTISEMENT