Sai Pallavi: “यापुढे बोलताना…” काश्मिरी पंडित-मॉब लिंचिंगच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

अभिनेत्री साई पल्लवीने काश्मिरी पंडित आणि मॉब लिंचिंगच्या घटना सारख्याच आहेत असं वक्तव्य साई पल्लवीने केलं होतं. त्यामुळे बराच वाद निर्माण झाल्यानंतर आता तिचं स्पष्टीकरण समोर आलं आहे. यापुढे बोलताना दोनदा विचार करेन असं साई पल्लवीने म्हटलं आहे. मी जे बोलले त्याचा विपर्यास केला गेला असं साई पल्लवीने म्हटलं आहे. साई पल्लवीने इंस्टाग्रामवर एक व्हीडिओ पोस्ट केला आहे. त्यात हे स्पष्टीकरण दिलं आहे.

साई पल्लवीने काय म्हटलं आहे?

असं पहिल्यांदाच घडलं आहे की मी एका गोष्टीचं स्पष्टीकरण देण्यासाठी तुमच्यासमोर आले आहे. माझे विचार मांडताना मी पहिल्यांदाच दोनवेळा विचार करते आहे. माझ्या शब्दांचा चुकीचा अर्थ लावला जाण्याची मला भीती वाटते आहे. मी तुमच्यापर्यंत माझं मत मांडायाला उशीर केला असेल तर त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करते.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मी एका मुलाखतीत जे वक्तव्य केलं त्यानंतर अनेकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या. मला वाटतं की कोणत्याही प्रकारची हिंसा किंवा कुठल्याही माणसाचा जीव घेतला जाणं चुकीचं आहे. मला आशा आहे की असा दिवस येणार की जेव्हा मूल जन्माला आलं की त्याला स्वतःची ओळख सांगायला भीती वाटेल. मला डावे की उजवे यांच्या विचारसरणीबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यानंतर मी न्यूट्रल आहे असं सांगितलं.

ADVERTISEMENT

मी जे वाक्य बोलले त्याचा संदर्भ न घेता ते चालवलं गेलं. तसंच बातम्या करून त्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. गेल्या काही दिवसांपासून माझ्या मागे जे लोक ठामपणे उभे राहिले त्या सगळ्यांचे मी आभार मानते असंही साई पल्लवीने म्हटलं आहे

ADVERTISEMENT

काय म्हटलं होतं साई पल्लवीने?

‘द काश्मीर फाईल्स या सिनेमात काश्मिरी पंडितांवर झालेला अन्याय आणि नरसंहार दाखवण्यात आला. धार्मिक वादावर बोलायचं झाल्यास गाईंची तस्करी करून घेऊन जाणाऱ्या मुस्लिम चालकाला मारण्यात आलं, जय श्रीराम या घोषणा देण्यात आल्या. काश्मीरमध्ये जे घडलं त्यात आणि मॉब लिंचिंगच्या घटनेत काय फरक आहे? दोन्ही घटना सारख्याच आहेत.” असं साई पल्लवीने म्हटलं आहे. तिच्या या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे.

Sai Pallavi : “काश्मिरी पंडितांची हत्या आणि मॉब लिचिंग यात काहीच फरक नाही”

मी लहान होते तेव्हापासून मला शिकवलं गेलं आहे की एक चांगली व्यक्ती होण्याचा प्रयत्न कर. त्यामुळे मी तटस्थ राहणं पसंत करते. ज्यांच्यासोबत अन्याय होतो आहे, त्यांची मदत करणं. कुणी लहान कुणी मोठं असं काही नसतं, सगळे समान आहेत असं ज्या घरात शिकवलं गेलं त्या वातावरणात मी वाढले आहे. डावे आणि उजवे यांच्याविषयी मी ऐकलं आहे. पण त्यांच्यात कोण योग्य कोण अयोग्य हे मला सांगता येणार नाही. मला काश्मिरी पंडितांवर अन्याय करणारे आणि मॉब लिंचिंग करणारे सारखेच वाटतात. तेव्हा जे घडलं त्यात आणि मॉब लिचिंगच्या घटनांच्या वेळी जे घडलं त्यात काय फरक आहे? असं साई पल्लवीने म्हटलं होतं. त्यानंतर आता तिने याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT