प्रतिक्षा संपली! अक्षय कुमारचा सूर्यवंशी ‘या’ दिवशी होणार रिलीज
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अक्षय कुमारचा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला सूर्यवंशी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली असून येत्या 30 एप्रिल रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे. अभिनेता अक्षय कुमारने सोशल मीडियावरून याची माहिती दिली आहे. We promised you all a cinematic […]
ADVERTISEMENT
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अक्षय कुमारचा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला सूर्यवंशी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली असून येत्या 30 एप्रिल रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे. अभिनेता अक्षय कुमारने सोशल मीडियावरून याची माहिती दिली आहे.
ADVERTISEMENT
We promised you all a cinematic experience and that’s what you will get…the wait is finally over! Aa Rahi Hai Police?♀️ #Sooryavanshi releasing worldwide in cinemas on 30th April 2021. #Sooryavanshi30thApril pic.twitter.com/IZbczUqmqu
— Akshay Kumar (@akshaykumar) March 14, 2021
अक्षय कुमार त्याच्या ट्विटमध्ये लिहितो की, “आम्ही सर्वांनी तुम्हाला चित्रपटाच्या दमदार एक्सपिरीयंस वचन दिलं होतं… आता अखेरीस ही प्रतीक्षा संपेल… पोलीस येत आहेत. सूर्यवंशी 30 एप्रिल 2021 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.” #Sooryavanshi30thApril असा हॅशटॅगदेखील अक्षयने दिलाय.
It was easiest to bond with Rohit because we shared one common passion which brought us together : Action! Happy birthday Rohit, wishing you an action-packed year ahead ? pic.twitter.com/E70qZ87VIG
— Akshay Kumar (@akshaykumar) March 14, 2021
सूर्यवंशी या सिनेमाचं दिग्दर्शन रोहीत शेट्टी करतोय. तर अक्षय कुमार आणि कतरिना कैफ ही जोडी पुन्हा पाहण्यासाठी चाहते मात्र उत्सुक आहेत. याशिवाय या सिनेमामध्ये अभिनेता अजय देवगण, रणवीर सिंग आणि जॅकी श्रॉफ देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
हे वाचलं का?
गेल्या वर्षी 2 मार्चला सूर्यवंशी सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला होता. त्यानंतर हा सिनेमाबद्दल प्रेक्षकांच्या मनात फार उत्सुकता होती. अखेर आज सिनेमाची रिलीज डेट जाहीर झाल्यानंतर चाहते मात्र आनंदीत झाले आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT