Supreme Court:’The Kerala Story’ चित्रपटावर बंदीची मागणी, नव्या वादाला फुटणार तोंड?

रोहिणी ठोंबरे

‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाविरोधातील याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. या चित्रपटावर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, ‘याचिकाकर्ते केरळ उच्च न्यायालयात जाऊ शकतात. कारण हा चित्रपट 5 मे रोजी प्रदर्शित होत आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

The Kerala Story : ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाविरोधातील याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. या चित्रपटावर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, ‘याचिकाकर्ते केरळ उच्च न्यायालयात जाऊ शकतात. कारण हा चित्रपट 5 मे रोजी प्रदर्शित होत आहे. त्यामुळेच उच्च न्यायालय या प्रकरणावर लवकरच सुनावणी करू शकते आणि त्यावर विचार करू शकते.’

केरळमधील 32,000 बेपत्ता मुलींची ही कथा आहे, असा दावा या चित्रपटात करण्यात आला आहे, ज्यांचे प्रथम ब्रेनवॉश करून त्यांना इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडले गेले. नंतर त्याला ISIS शी जोडून दहशतवादी बनवण्यात आले.

शरद पवारांनी दिले वेगळेच संकेत; ‘त्या’ विधानाचा अर्थ काय?

‘द केरळ स्टोरी’विरोधातील आंदोलन संपणार!

‘द केरळ स्टोरी’वरून वाद सुरू आहे. चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी होत आहे. यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली होती. त्यावर न्यायालयाने आपला निकाल दिला आहे. ‘द केरळ स्टोरी’बाबत सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, ‘सर्वोच्च न्यायालय प्रत्येक प्रकरणात उपाय म्हणून येऊ शकत नाही. याप्रकरणी उच्च न्यायालयात ही जाऊ शकता.’

‘द केरळ स्टोरी’ मध्ये मुख्य भूमिकेत दिसणारी अभिनेत्री अदा शर्मा विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या चित्रपटात नर्स बनू इच्छिणाऱ्या मुलीची कथा दाखवण्यात आली आहे. पण ती ISIS ची दहशतवादी बनते. ‘द केरळ स्टोरी’च्या ट्रेलरमध्ये ब्रेन वॉश, लव्ह जिहाद, हिजाब आणि ISIS सारखे शब्द वापरण्यात आले आहेत. हा चित्रपट मुस्लिमांच्या विरोधात आहे. याचिकेत ‘द केरळ स्टोरी’वर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती.

हे वाचलं का?

    follow whatsapp