कंगना रणौतचा ‘Tejas’ आपटला! 50 टक्के शो करावे लागले रद्द

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Kangana Ranaut's Tejas Movie Flop on Box Office 50 percent shows had to be cancelled
Kangana Ranaut's Tejas Movie Flop on Box Office 50 percent shows had to be cancelled
social share
google news

Tejas Movie Box Office Collection : कंगना राणौतचा (Kangana Ranaut) तेजस रिलीज होऊन केवळ 5 दिवस झाले आहेत, परंतु हा चित्रपट उंच भरारी घेण्यात फारच अपयशी ठरला आहे. पडद्यावर पहिल्यांदा एअरफोर्स ऑफिसरची भूमिका साकारणाऱ्या कंगनाच्या तेजसला बॉलिवूडची (Bollywood) पहिली एरियल अॅक्शन फिल्मही म्हटलं जात होतं. पण चौथ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची अवस्था इतकी वाईट होईल की, शो देखील रद्द करावे लागतील, असे कोणालाच वाटले नव्हते. (Kangana Ranaut’s Tejas Movie Flop on Box Office 50 percent shows had to be cancelled)

बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाईची अपेक्षा असताना ‘तेजस’ ठरला फ्लॉप!

तेजसच्या घोषणेपासून ते रिलीज होईपर्यंत या चित्रपटाबद्दल चर्चा होती. लोकांच्या अपेक्षाही खूप वाढल्या होत्या. मात्र प्रदर्शित झाल्यानंतर हा चित्रपट अपयशी ठरला. चित्रपटाला प्रेक्षक मिळत नाहीत. चित्रपटाची कथा आणि VFX या दोन्ही गोष्टी प्रेक्षकांना आकर्षित करण्यात अपयशी ठरल्या आहेत. पहिल्या दिवसापासून कंगनाच्या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला.

वाचा: Maratha Reservation: “…तर आज आंदोलनाची वेळच आली नसती”, बावनकुळे ठाकरेंवर भडकले

बॉक्स ऑफिसच्या आकडेवारीवर नजर टाकली तर तेजसने पहिल्या दिवशी 1.11 कोटी रुपयांची कमाई केली होती. चित्रपटाने दुसऱ्या दिवशी 2.51 कोटींची कमाई केली. तिसऱ्या दिवशी थोडी वाढ झाली आणि तेजसने 3.12 कोटी रुपये कमावले. पण नंतर वीकेंडला एकही तिकीट विकणे कठीण झाले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

वाचा: Maratha Reservation : ठाकरे सरकारवर प्रचंड भडकले, ‘राजीनामा का देता,सत्तेत बसून प्रश्न सोडवा’

Tejas : रद्द झाले शोज

मिळालेल्या माहितीनुसार, तेजसची सुरुवात खूपच कमी कमाईतून झाली. आता परिस्थिती अशी आहे की, एकही तिकीट विकणे अशक्य झाले आहे. वीकेंड हा कोणत्याही चित्रपटासाठी महत्त्वाचा मानला जातो. चित्रपट पडेपर्यंत तो काही पैसे कमावतो. पण माहितीनुसार, तेजसच्या एका शोची ऑक्युपेंसी फक्त 12-13 तिकिटे होती. त्यामुळे थिएटर मालकांनी सोमवारपासून त्याचे ५० शो रद्द करण्याचा निर्णय घेतला. पण, काही प्रेक्षकांचं म्हणणं आहे की, चित्रपटाची कथा तितकी वाईट नाही जितकी ती दाखवली जात आहे.

वाचा: Manoj Jarange पाटलांची CM शिंदेंकडे मोठी मागणी, अर्धा तास काय झाली चर्चा?

एकही तिकीट न विकल्यामुळे बिहारमधील रूपबानी सिनेमागृहात चित्रपटाचे सकाळचे सर्व शो रद्द करण्यात आले. चित्रपटाच्या तिकीटांची विक्री न झाल्यामुळे त्याच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर खूप वाईट परिणाम होत आहे. तेजसने सोमवारी फक्त 40 लाख रुपये जमा केले होते. चित्रपटाचे एकूण कलेक्शन 4.60 कोटी आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT