पठ्ठ्याने केली कमाल प्रसाद ओकचा धर्मवीर एकट्याने पाहता यावा यासाठी केलं अख्खं थिएटर बुक

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

अभिनेता प्रसाद ओकचा सिनेमा ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. यामध्ये शिवसेनेचे नेते दिवंगत आनंद दिघे यांची भूमिका प्रसाद ओक याने साकारली आहे. या बायोपिकचे दिग्दर्शन प्रवीण तरडे यांनी केले आहे. प्रसादच्या भूमिकेचं कौतुक करताना प्रेक्षक थकत नाही आहेत, समीक्षकांचीही वाहवा या सिनेमाने मिळवली आहे. सिनेसृष्टीतील विविध कलाकारांनी देखील या चित्रपटाचे, दिग्दर्शनाचे आणि निर्मितीसाठी असा विषय निवडणाऱ्या निर्मात्यांचे कौतुक होत आहे.

ADVERTISEMENT

दरम्यान धर्मवीर सिनेमाबाबत असं काही घडलं आहे जे की कदाचित मराठी सिनेमाबाबत कधी घडलं नसावं. स्वत: प्रसाद ओकने अशी पोस्ट केली आहे. घडलं असं की ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा सिनेमा पाहण्यासाठी एकच प्रेक्षक उपस्थित होता. तरीही प्रसाद ओकने आनंदाने आणि भावुक होत ही पोस्ट शेअर केली आहे. तुम्ही म्हणाल की एक प्रेक्षक असताना आनंद कसा काय झाला? तर एका सिनेरसिकाने प्रसाद ओकच्या अभिनयावरील प्रेमाखातर संपूर्ण थिएटर बुक करुन एकट्याने हा सिनेमा पाहिला आहे. ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा सिनेमा पाहण्यासाठी आचार्य श्री धर्मराज गुरुजी यांनी संपूर्ण सिनेमागृह बुक केले होते. प्रसाद ओकने व्हिडीओ शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.

हे वाचलं का?

प्रसाद ओकने ही पोस्ट शेअर करताना म्हटलं आहे की, ‘धर्मवीरचा शो पाहायला सिनेमागृहात “फक्त एकच माणूस”? मराठी कलाकाराच्या बाबतीत किंवा मराठी सिनेमासृष्टीत हे कदाचित पहिल्यांदाच घडत असावं…! याचं कारण हा व्हिडीओ पूर्ण पाहिल्यानंतरच कळेल…!!!’ त्याने हा व्हिडीओ शेअर करत आचार्य श्री धर्मराज गुरूजी यांचे आभार मानले आहेत.

ADVERTISEMENT

प्रसाद ओकचे कौतुक करताना ते पुढे म्हणाले की, ‘मी जेवढं त्यांचं काम पाहिलं आहे ते एक अष्टपैलू अभिनेते आहेत. आज मी त्यांना धन्यवाद म्हणेन. तुम्ही माझ्या धर्मराज फाऊंडेशनसाठी छोटासा व्हिडीओ दिला होता, तर तुम्हाला स्पेशल थँक्स म्हणण्यासाठी मी आज इथे थिएटर माझ्या एकट्यासाठी बुक केले आहे. मी एकटा बसून इथे मुव्ही बघतो आहे. कारण तुमचा सिनेमा पाहताना मला कोणताही आवाज नको होता. कारण अनेकदा मुव्ही पाहताना मागून आवाज येत असतो, कमेंट्स सुरू असतात. मला या सिनेमात फक्त तुम्हाला बघायचे होते.’

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT