Salman Khan Emotional : बिग बॉसच्या स्टेजवर सलमान भावूक, म्हणाला मला इथं यायचं नव्हतं, पण...

मुंबई तक

Salman Khan Bigg Boss मुंबई : बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा आणि सलमानचा सलमान खान आणि त्याचं कुटुंब मोठ्या चिंतेत आहे. त्यामुळे सलमान बिग बॉसच्या विकेंडचा वार या कार्यक्रमाला येणार नाही असं चाहत्यांना वाटत होतं.

ADVERTISEMENT

बिग बॉसच्या स्टेजवर सलमान भावूक (फोटो सौजन्य : Colors TV)
बिग बॉसच्या स्टेजवर सलमान भावूक
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अभिनेता सलमानने शूटींग थांबवलं नाही?

point

सिद्दीकींच्या हत्येनंतर पहिल्यांदाच काय म्हणाला सलमान?

point

सलमान खान भावूक? चाहत्यांमध्ये चर्चा

Salman Khan Bigg Boss मुंबई : अभिनेता सलमान खान सध्या बाबा सिद्दीकी यांच्या मृत्यूच्या धक्क्यामध्ये आहे. तर दुसरीकडे सध्या सलमान खानचा बहुचर्चित बिग बॉस हा कार्यक्रम सुद्धा सुरू आहे. आठवडाभरापूर्वी बाबा सिद्दीकी यांचा झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर गोळ्या झाडून खून करण्यात आला. त्यामुळे आता सलमान खान 'विकेंड का वार' या भागासाठी उपस्थित राहणार का? यावर अनेकांचं लक्ष लागून होतं. बाबा सिद्दीकींच्या हत्येचा आणि सलमानला दिल्या जाणाऱ्या धमक्यांचा थेट संबंध जोडला जात असल्यानं सलमान खान आणि त्याचं कुटुंब मोठ्या चिंतेत आहे. त्यामुळे सलमान बिग बॉसच्या 'विकेंडचा वार' या कार्यक्रमाला येणार नाही असं चाहत्यांना वाटत होतं. मात्र नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमधून सलमान या कार्यक्रमाला हजर राहणार असल्याचं समोर आलंय. (Salman Khan emotional on bigg boss weekend ka war amid baba Siddique shot by Lawrence Bishnoi gang)

हे ही वाचा >> IRS अधिकारी समीर वानखेडेंची 'ही' मोठी अडचण, नेमकं घडलंय तरी काय?

 

अभिनेता सलमान खानला गेल्या अनेक दिवसांपासून लॉरेन्स बिश्नोई गँगकडून धमक्या येत होत्या. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी सलमान खानच्या घरावर गोळीबार देखील करण्यात आला. या गोळीबारानंतर सलमान खानचं कुटुंब चिंतेत होतं. त्यातच अलीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री असलेले बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आल्याने सलमान खानचं  कुटुंब चिंतेत आहे. तर दुसरीकडे सलमान खान प्रसिद्ध अशा बिग बॉस या कार्यक्रमाचा होस्ट सुद्धा आहे. दरआठवड्याच्या शनिवार आणि रविवारी होणाऱ्या विकेंड का वार या कार्यक्रमातला तो अविभाज्य भाग असतो. मात्र बाबा सिद्दीकींच्या मृत्यूच्या धक्क्यानंतर सुरक्षेच्या कारणांमुळे तो येणार नाही असं म्हटलं गेलं. मात्र सलमान खान या कार्यक्रमाला उपस्थित राहिला आणि त्यानं आपल्या भावनाही व्यक्त केल्या.

https://www.instagram.com/p/DBTG0Bnt9jE/?utm_source=ig_embed&utm_campaign=embed_video_watch_again

 

हे वाचलं का?

    follow whatsapp