सनी लियोनवर 29 लाख रूपयांचा फ्रॉड केल्याचा आरोप

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बॉलिवूड अभिनेत्री सनी लियोन अडचणीत सापडली आहे. सनीने लाखो रूपये घेतले असून ते परत केले नसल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे. यासंदर्भात क्राईम ब्रांच अंतर्गत चौकशी सुरु असल्याची माहिती आहे. दरम्यान या प्रकरणात सनीने स्पष्टीकरण दिलं असून तिने आपण निर्दोष असल्याचं म्हटलं आहे.

पेरूमबवूरमधील इव्हेंट कॉर्डिनेटर शियासने सनी लियोनवर हे आरोप केले आहेत. सनीने 2016 मध्ये 12 इव्हेंट्ससाठी 29 लाख रूपये घेतले असल्याची सांगण्यात येतंय. मात्र पैसे घेऊन सनीने हा इव्हेंट केला नाही. यासंदर्भातील कागदपत्रही शियासने पुरावे म्हणून सादर केले आहेत.

यासंदर्भात केरळ क्राईम ब्रांचने सनी लियोनची चौकशी केली आहे. या चौकशीदरम्यान सनीने केवळ 5 वेळा पैसे घेतल्याचं सांगितलं आहे. शिवाय हा इव्हेंट सतत पुढे ढकलला जात होता असंही सनीने सांगितलंय. गेल्या महिन्यात सनी कुटुंबासोबत केरळला सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेली होती. यावेळी एका खाजगी चॅनेलसोबत तिचं शूटींग देखील ठरलं होतं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT