Horoscope In Marathi : सूर्यासारखं चमकेल 'या' राशींचं भाग्य! दिवाळीआधीच काही राशी होतील मालामाल
26 October 2024 Horoscope : ज्योतिष शास्त्रात एकूण 12 राशींचं वर्णन केलं जातं. प्रत्येक राशीचा स्वामी ग्रह असतो. ग्रह-नक्षत्रांच्या स्थितीनुसार राशी भविष्याची माहिती दिली जाते.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
या राशींचं नशीब चमकणार? तुमचं भविष्य काय?
काही राशीच्या लोकांना मिळणार पैसाच पैसा, तर काही होतील कंगाल
या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल आरोग्याची काळजी
26 October 2024 Horoscope : ज्योतिष शास्त्रात एकूण 12 राशींचं वर्णन केलं जातं. प्रत्येक राशीचा स्वामी ग्रह असतो. ग्रह-नक्षत्रांच्या स्थितीनुसार राशी भविष्याची माहिती दिली जाते. 26 ऑक्टोबर 2024 ला शनिवार आहे. शनिवारच्या दिवशी हनुमानाची पूजा करतात. धार्मिक मान्यतेनुसार, हनुमानाची पूजा केल्यानं सुख-समृद्धी प्राप्त होते. ज्योतिष गणनेनुसार, 26 ऑक्टोबरचा दिवस काही राशींसाठी शुभ असणार आहे. तर काही राशींच्या लोकांना समस्यांचा सामना करावा लागू शकतो, जाणून घ्या सर्व राशींबद्दल सविस्तर माहिती.
मेष राशी
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ असेल. कार्यात सकारात्मक रिझल्ट मिळेल. कार्यालयीन कामकाजाची जबाबदारी वाढेल. आर्थिक गोष्टींकडे लक्ष द्यावं लागेल.
वृषभ राशी
आज वृषभ राशीच्या लोकांची कोर्ट-कचेरीच्या प्रकरणात सुटका होऊ शकते. सामाजिक जीवनात प्रगती होईल. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांना आनंदाची बातमी मिळेल. घरात सुख शांती नांदेल.
मिथुन राशी
आज मिथुन राशीच्या लोकांना कौटुंबीक सहकार्य मिळेल. आयुष्यात नवीन गोष्टी सुरु करा. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. कार्यालयीन कामकाजात व्यस्त राहाल.










