Cm Vayoshri Yojana : 'लाडक्या बहिणी'नंतर कुणाला मिळणार 3000 रूपये?

मुंबई तक

ADVERTISEMENT

cm vayoshri yojana for senior citizen above 65 years of age how to apply and get benefit read full article
लाडक्या बहिणीनंतर ज्येष्ठांना 3000 रूपये मिळणार आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

महिलांनंतर आता ज्येष्ठांना मिळणार 3000 रूपये

point

मुख्यमंत्री वयोश्री योजना नेमकी काय?

point

65 वर्षांवरील ज्येष्ठांना या योजनेचा लाभ मिळणार

Cm Vayoshri Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत (Mukhymantri Majhi Ladki Bahin Yojana) महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट असे एकत्रित मिळून 3000 रूपये जमा झाले आहेत. यानंतर महिला आता सप्टेंबरमध्ये येणाऱ्या तिसऱ्या हप्त्याची वाट पाहत आहे. त्यानंतर आता लाडक्या बहिणीनंतर ज्येष्ठांना 3000 रूपये मिळणार आहे. मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत (Cm Vayoshri Yojana)  ज्येष्ठांना हे पैसे मिळणार आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ कुणाला घेता येणार आहे? या योजनेच्या अटी काय आहेत?  आणि या योजनेत कोण पात्र ठरणार आहेत? हे जाणून घेऊयात. (cm vayoshri yojana for senior citizen above 65 years of age how to apply and get benefit read full article) 

ADVERTISEMENT

राज्यातील 65 वर्षे वय आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने/ उपकरणे खरेदी करण्यासाठी तसेच मन: स्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र उपलब्ध करणे. मानसिक स्वास्थ संतुलित ठेवण्यासाठी मनस्वास्थ केंद्रे, योगोपचार केंद्रांद्वारे प्रबोधन, प्रशिक्षण देण्यासाठी पात्र लाभार्थींना 3000 रूपये एकरकमी थेट लाभ त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहेत. 

हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : तुमचा अर्ज रिजेक्ट झालाय, तरी 4500 खात्यात डिपॉझिट होणार?

या योजनेतंर्गत पात्र वृद्ध लाभार्थ्यांना त्यांची शारीरीक असमर्थता, दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधणे, उपकरणे यात चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टीक, व्हीलचेअर, फोल्डींग वॉकर, कमोड खुर्ची, नि-ब्रेस, लंबर बेल्ट, सर्वाइकल कॉलर इत्यादी खरेदी करता येतील.  

हे वाचलं का?

योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागणार? 

  1. आधारकार्ड/ मतदान कार्ड
  2. पासपोर्ट आकाराचे 2 फोटो 
  3. राष्ट्रीयकृत बँकेच्या बँक पासबूकची झेरॉक्स
  4. स्वयं-घोषणाफत्र 
  5. शासनाने ओळखपत्र पटवण्यासाठी विहीत केलेली अन्य कागदपत्रे. 

योजनेचे निकष काय? 

  • 31 डिसेंबर, 2023 अखेर वयाची 65 वर्षे पुर्ण केलेली असावीत.
  • आधारकार्ड असणे आवश्यक आहे. आधारकार्डची पावती देखील चालणार आहे. 
  • आधारकार्ड नसल्यास स्वतंत्र ओळखपत्र दस्तावेज असतील तर ते ओळख पटविण्यासाठी स्वीकारार्ह असावे. 
  • लाभार्थी पात्रतेसाठी जिल्हा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र किंवा बीपीएल रेशन कार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमांतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजने अंतर्गत किंवा राज्य / केंद्रशासित सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योनजे अंतर्गत वृद्धापकाळ निवृत्तीवेतन मिळाल्याचा पुरावा सादर करु शकतो.
  • लाभार्थ्याचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 2 लाख रुपयांच्या आत असावे.

अर्ज कसा करायचा?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला एक फॉर्म भरावा लागेल. या फॉर्मची लिंक (क्लिक करा) येथे मिळेल. हा फॉर्म योग्य रित्या भरून. ग्रामपंचायत ऑफिस मध्ये सबमिट करा.

हे ही वाचा : Lakhapati Didi Yojana : महिलांनो 5 लाखांची मदत मिळणार, 'लखपती दीदी' योजना नेमकी काय?

फॉर्ममध्ये तुम्हाला पासपोर्ट साईज फोटो चिकटवावा लागेल, त्यानंतर तुम्हाला तुमचं संपूर्ण नाव लिहाव लागेल.  तुमचं वय, व्यवसाय, गावाचे नाव, तालुका, जिल्हा यासारखे प्राथमिक तपशील भरायचे आहेत.यासोबत लिंग, जात आणि प्रवर्ग, मोबाईल क्रमांक आणि कौटुंबिक वार्षिक उत्पन्न (कमाल ₹2,00,000) भरायचे आहे. 

ADVERTISEMENT

तुम्ही मागील तीन वर्षांत कोणत्याही सरकारी योजनेतून लाभ घेतलेला नाही, याबद्दलचे घोषणापत्र भरायचे आहे. हे घोषणापत्र तुमच्या पात्रतेसाठी महत्त्वाचे आहे. फॉर्म मध्ये हे देखील जागा दिलेली आहे आणि भरणे अनिवार्य आहे.

ADVERTISEMENT

दरम्यान फॉर्म भरून झाल्यानंतर तुम्हाला आवश्यक कागदपत्रे जोडून तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये फॉर्म जमा करा. या फॉर्ममध्ये तपशील अचूक भरणे आवश्यक आहे, नाहीतर फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT