तुम्हालाही सोशल मीडियावर मेसेज फॉरवर्ड करण्याची सवय? सावध व्हा, जावं लागेल तुरुंगात
सध्याच्या काळात व्हॉट्सअॅप, फेसबुक किंवा इंस्टाग्रामचा मोठ्याप्रमाणात वापर केला जातो. आता आपल्याला या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे व्यसन लागलं आहे, असं म्हणणं काही चुकीचं नाहीये. सकाळी व्हॉट्सअॅप मेसेज आणि इंस्टा पोस्ट पाहिल्याशिवाय दिवस सुरूच होत नाही. मग ते मेसेज पाहून, आपण काहीवेळेस इतरांनाही फॉरवर्ड करतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, मेसेज फॉरवर्डिंगमुळे तुम्ही अडचणीतही सापडू शकता.
ADVERTISEMENT
Venkataraman Shekher Case : सध्याच्या काळात व्हॉट्सअॅप, फेसबुक किंवा इंस्टाग्रामचा मोठ्याप्रमाणात वापर केला जातो. आता आपल्याला या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे व्यसन लागलं आहे, असं म्हणणं काही चुकीचं नाहीये. सकाळी व्हॉट्सअॅप मेसेज आणि इंस्टा पोस्ट पाहिल्याशिवाय दिवस सुरूच होत नाही. मग ते मेसेज पाहून, आपण काहीवेळेस इतरांनाही फॉरवर्ड करतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, मेसेज फॉरवर्डिंगमुळे तुम्ही अडचणीतही सापडू शकता. (Habit of forwarding messages on social media Be careful, you have to go to jail)
ADVERTISEMENT
असंच एक प्रकरण आहे जिथे सर्वोच्च न्यायालयात याबाबत युक्तिवाद करण्यात आला. जरा विचार करा, जर महिलांविरोधात अश्लील पोस्ट शेअर केल्यावर कोणी असा युक्तिवाद केला तर काय होईल? असाच काहीसा प्रकार सर्वोच्च न्यायालयात घडला. आता आपण सोशल मीडियावर आक्षेपार्ह मेसेज फॉरवर्ड करून चुकून झालं असं म्हणून सुटू शकत नाही. आधी नेमकं प्रकरण काय आहे ते आपण समजून घेऊयात.
शरद पवार-अजित पवार भेटीचं संजय राऊतांनी सांगितलं तिसरंच कारण; शिदेंना दिला इशारा
हे प्रकरण 2018 मधील आहे. 19 एप्रिल 2018 रोजी एस वेंकटरामन शेखर यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवरून महिला पत्रकारांविरोधात एक आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली होती. एस वेंकटरामन शेखर हे तामिळनाडूचे माजी आमदार आणि भाजप नेते आहेत. यापूर्वी ते जयललिता यांचा पक्ष AIADMK (अण्णाद्रमुक) मध्ये होते. अण्णाद्रमुकमध्ये असतानाच ते आमदार झाले. शेखर यांची अभिनेता, दिग्दर्शक, पटकथा लेखक, नाटक लेखक म्हणून तामिळ चित्रपटसृष्टीत चांगली ओळख आहे.
हे वाचलं का?
आक्षेपार्ह पोस्टमुळे शेखर यांच्यावर गुन्हा दाखल!
2018 मध्ये शेखर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी तामिळनाडूत त्यांच्या विरोधात जोरदार निदर्शने झाली. त्यांना दोषी ठरवण्यात आले. त्यानंतर हे प्रकरण उच्च न्यायालयात पोहोचले. यावर्षी 15 जुलै रोजी मद्रास उच्च न्यायालयाने शेखर यांचा दिलासा मागणारा अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण टिप्पणी करत म्हटले होते की, ‘आपण अशा काळात राहतो जिथे सोशल मीडियाने प्रत्येक व्यक्तीचे आयुष्य व्यापले आहे. जिथे प्रत्येकावर मेसेजेसचा भडिमार केला जात आहे आणि यामुळेच प्रत्येकाने मेसेज फॉरवर्ड करताना सामाजिक जबाबदारी पार पाडली पाहिजे.’
ADVERTISEMENT
Chhagan Bhujbal : ‘ब्राह्मणांमध्ये शिवाजी-संभाजी नावे ठेवत नाही’, भुजबळांचं विधान
ही टिप्पणी केवळ एस व्यंकटरमण शेखर यांच्यासाठीच नव्हती. ही टिप्पणी सर्वांसाठीच आहे. कोणताही मेसेज तुमच्या कुटुंबाच्या, मित्र-मैत्रिणींच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर येतो. जे आपल्याला मनोरंजक वाटते. आपण ते काहीही विचार न करता इतर ग्रुप्सवर फॉरवर्ड करतो. फेसबुक आणि इंस्टाग्रामवरही असेच केले जात आहे. इथे दोन-तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कोणतीही गोष्ट फॉरवर्ड करण्यापूर्वी त्याची सत्यता तपासली पाहिजे.
ADVERTISEMENT
नुकतीच एक फोटो व्हायरल झाल्याची घटना तुम्ही पाहिली असेल. 15 ऑगस्ट रोजी जेव्हा भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी लाल किल्ल्यावर गृहमंत्र्यांची भेट घेतली तेव्हा अमित शाह सरन्यायाधीशांना न भेटता पुढे गेले. सरन्यायाधीश अमित शहांना नमस्कार करत असताना. या प्रकरणाचा एक फोटो खूप शेअर झाला. त्यावेळचा संपूर्ण व्हिडीओ समोर आल्यावर असे काही घडलेच नसल्याचे दिसून आले. अमित शहा हे सरन्यायाधीशांना भेटले होते आणि जो फोटो व्हायरल होत होता तो बैठकीनंतरचा होता.
हे एकमेव उदाहरण नव्हते. अशी अनेक उदाहरणं आहेत ज्यात जाणूनबुजून किंवा नकळत आपण अशा पोस्ट महिलांविरुद्ध, अपंगांविरोधात, विशिष्ट जातीविरुद्ध आणि विशिष्ट धर्माविरुद्ध शेअर करत असतो. यात दाहक विधानांचाही समावेश आहे. जे केवळ सामाजिकदृष्ट्या चुकीचे नाही तर कायदेशीरदृष्ट्याही गुन्हा आहे. आणि जे हे करतात ते फक्त कमी शिकलेली किंवा तरुण मुलं नसतात, सर्व वयोगटातील लोक हे करत असतात.
एस. व्ही.शेखर यांनीही असंच काहीसं केलं होते. त्यांनी महिलांविरोधातील पोस्ट शेअर केली. ज्याचे परिणाम त्यांना भोगावे लागले. या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली तेव्हा न्यायालयाने आरोपी शेखर यांना फटकारले.
सर्वोच्च न्यायालयात शेखर याचा आयड्रॉप आणि चुकून सेंड बटण क्लिक झाल्याचा युक्तिवाद कामी आला नाही. न्यायमूर्ती पीके मिश्रा आणि न्यायमूर्ती बीआर गवई यांच्या खंडपीठाने सुनावणीदरम्यान शेखर यांना विचारले की, डोळ्यात आयड्रॉप टाकत असताना सोशल मीडियावर पोस्ट का फॉरवर्ड केली? यावर त्यांच्या वकिलाने स्पष्टीकरण दिले की, ‘सोशल मीडिया आता आपल्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. ज्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.’
Crime: शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिला, तरूणाने स्क्रू डायव्हरने…लिव्ह इन पार्टनरसोबत भयंकर कृत्य
त्यावर आपले उदाहरण देताना न्यायमूर्ती गवई म्हणाले, ‘आम्ही तर सोशल मीडियाशिवाय सहज जगत आहोत. सोशल मीडिया हा आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहे असे मला वाटत नाही.’
न्यायालयाने वकिलाला शेखर यांचे वयही विचारले. वकिलाने सांगितले की, ‘त्यांचा क्लायंट 72 वर्षांचा आहे.’ यावर न्यायालयाने विचारले, ‘या वयात असे काम करायचे का?’ सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत म्हटलं की, ‘जर आपण सोशल मीडिया वापरत असाल तर आपण अधिक काळजी घेतली पाहिजे.’
शेखर यांच्या वतीने त्यांना दुसऱ्या व्यक्तीकडून मेसेज आल्याचा युक्तिवाद करण्यात आला. जो त्यांनी न वाचताच फॉरवर्ड केला. नंतर तो मेसेज डिलीट केला आणि माफीही मागितली.
पण तो न वाचता सोशल मीडियावर फॉरवर्ड केल्याचा युक्तिवाद करून कोणतीही व्यक्ती सुटू शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. आपल्या अकाऊंटवरून आक्षेपार्ह मेसेज पाठवला जात असेल तर त्याला आपणच जबाबदार आहोत. असे न्यायालयाने सांगितले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT