Mahim Vidhansabha: राज ठाकरेंच्या घरी काय घडलं, सदा सरवणकरांनी सगळंच सांगून टाकलं?

मुंबई तक

शिवसेना नेते सदा सरवणकर यांनी राज ठाकरे यांची भेट मागितली होती. मात्र, ती नाकारण्यात आली. याबाबत सदा सरवणकर नेमकं काय म्हणाले ते पाहा.

ADVERTISEMENT

सदा सरवणकरांनी सगळंच सांगून टाकलं?
सदा सरवणकरांनी सगळंच सांगून टाकलं?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सदा सरवणकरांच्या घरापर्यंत गेले पण राज ठाकरे भेटलेच नाही

point

राज ठाकरेंनी सदा सरवणकरांना भेट नाकारली

point

सदा सरवणकरांनी नेमकं काय सांगितलं..

मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सध्या सर्वाधिक चर्चेत असलेला मतदारसंघ हा माहीमचा आहे. जिथून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे हे निवडणूक लढवत आहेत. जेव्हापासून अमित ठाकरे यांच्या नावाची माहीम मतदारसंघासाठी घोषणा झाली तेव्हापासूनच या मतदारसंघातून सदा सरवणकरांवर सातत्याने दबाव वाढत होता. मात्र, शेवटच्या क्षणापर्यंत मागे हटायचं नाही असं ठरवलेल्या सरवणकरांनी आपला अर्ज कायम ठेवला. पण त्याआधी काही तोडगा निघावा यासाठी सदा सरवणकरांनी राज ठाकरेंची त्यांच्या घरी भेट मागितली होती. मात्र, ही भेट नाकारण्यात आली. (maharashtra assembly election 2024 mahim vidhan sabha what happened at raj thackerays house sada saravankar told everything)

दरम्यान, फॉर्म मागे घ्यायच्या दिवशी माहीम मतदारसंघात बऱ्याच नाट्यमय घडामोडी घडल्या. सदा सरवणकर यांनी अर्ज मागे घ्यावा यासाठी त्यांच्यावर बराच दबाव होता. अर्ज घेण्यासाठी काही तास उरलेले असतानाच सदा सरवणकर हे थेट 'वर्षा'वर पोहचले. जिथे त्यांनी 1 तास मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी चर्चा केली.

हे ही वाचा>> Raj Thackeray Dombivali : हिंदुहृदयसम्राट काढलं, जनाब लावलं.... पहिल्याच सभेत उद्धव ठाकरेंवर वार, शिंदे-अजितदादांनाही टोले

यानंतर बाहेर येत त्यांनी माध्यमांना सांगितलं की, 'मी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर अमितजी निवडून आलेच पाहिजे अशी आमची भावना आहे. तिथलं जे समीकरण आहे हे समीकरण अमितजी निवडून येतील अशी काही खात्री नाही. म्हणून राजसाहेबांना आम्ही जाऊन भेटणार आहोत. त्यांना विनंती करणार आहोत. तसंच जे समीकरण आहे ते समजवून सांगणार आहोत.'

सदा सरवणकरांना राज ठाकरे भेटले नाही... 

दरम्यान, काही वेळातच सदा सरवणकर हे 'शिवतीर्थ' येथे पोहचले. पण राज ठाकरेंची भेट मिळावी यासाठी त्यांनी आपला मुलगा समाधान सरवणकर आणि काही पदाधिकाऱ्यांना राज ठाकरेंच्या घरी पाठवलं आणि ते स्वत: शिवतीर्थ जवळच थांबले. 

हे वाचलं का?

    follow whatsapp