देवेंद्र फडणवीसांच्या मुलाखतीने सुरू होणार ‘मुंबई Tak बैठक’
महाराष्ट्राच्या राजकारणातील दिग्गज आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये गुरुवारी (१३ एप्रिल) ‘मुंबई Tak बैठक’ पार पडणार आहे.
ADVERTISEMENT
Mumbai Tak Baithak : मुंबई: राजकीय घडामोडींचा अर्थ समजून घ्यायचा म्हणजे ‘मुंबई Tak’, असं अशी ओळख महाराष्ट्रात रूजत असून, आता राज्यातील राजकारणातील दिग्गज आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये थोड्याच वेळात (१३ एप्रिल) ‘मुंबई Tak बैठक’ (Mumbai Tak Baithak) सुरू होत आहे. मुंबईमधील हॉटेल ताज प्रेसिडेंट होत असून सायंकाळपर्यंत भरगच्च कार्यक्रम असणार आहेत. यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची खास मुलाखत, राजकीय नेत्यांशी संवाद आणि सिनेक्षेत्रातील खास गप्पाचा कार्यक्रम होणार आहे. (Mumbai tak baithak will be held on april 13 in the presence of Maharashtra political and cultural dignitaries)
ADVERTISEMENT
सकाळी 9 वाजता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या सोहळ्याचे पहिले प्रमुख पाहुणे असणार आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सकाळी साडे दहा वाजता या सोहळ्यातील दुसरे सत्र पार पडणार आहे. महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय घडामोडी, महाराष्ट्राचा विकास, महाराष्ट्रापुढील प्रश्न आणि भविष्यातील महाराष्ट्राची वाटचाल याबाबत समजून घेण्यासाठी या दोन्ही मान्यवरांचे सत्र महत्वाचे असणार आहे.
हे वाचलं का?
जयंत पाटील, अशोक चव्हाण यांच्याशी संवाद :
त्यानंतर साडे अकरा वाजता राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये तिसरे सत्र पार पडणार आहे. सध्याच्या सरकारचे काम, विरोधकांची एकजूट, महाविकास आघाडीतील धुसफूसविषयीच्या चर्चा, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची विविध विषयांवरील भूमिका या पार्श्वभूमीवर पाटील आणि चव्हाण यांच्या सत्रात चर्चा होणार आहे.
ADVERTISEMENT
सिने क्षेत्रातील कलाकारांशी खास गप्पा :
राजकीय गप्पांनंतर ‘मुबई Tak बैठक’मध्ये कला आणि सिने क्षेत्रातील गप्पांचा खास कार्यक्रम रंगणार आहे. दुपारी साडे बारा वाजता अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि अभिनेत्री सायली संजीव यांच्या उपस्थितीमध्ये सांस्कृतिक पार पडणार आहे. याशिवाय दिग्दर्शक नागराज मंजुळे, निर्माते परेश मोकाशी, नितीन वैद्य आणि मंगेश कुळकर्णी यांच्याशी साडे तीन वाजता गप्पा रंगणार आहेत.
ADVERTISEMENT
राजकीय गप्पांचे सत्र :
या दरम्यान, राजकीय गप्पांचे सत्र सुरु राहणार आहे. अडीच वाजता शिवसेना (UBT) नेते संजय राऊत आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी गप्पा होणार आहेत. तर दुपारी 3 वाजता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याशी संवाद होणार आहे. सव्वा चार वाजता युवा सेनेचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक होणार आहे. पाऊणे पाच वाजता अभिनेता रितेश देशमुख ‘बैठक’च्या मंचावर येणार असून त्यांच्याशी मजेदार आणि खुमासदार गप्पा झाल्यानंतर सोहळ्याची सांगता होणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT