पैशांच्या देवाणघेवाणीतून वाद : कोल्हापुरातील तीन मित्रांनी आपल्या जिवलग मित्राला संपवलं
कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील तीन तरुणांनी आपल्याच जिवलग मित्राला पैशाच्या वादातून संपवल्याचं समोर आलं आहे. प्रशांत भिसे (वय २८) असं या मृत तरुणाचं नाव असून त्याचा अर्धवट जळालेला मृतदेह पोलीसांना मिळाला होता. या हत्याकांडाचा काही तासांत उलगडा करणण्यात पोलीसांना यश आलं आहे. आतापर्यंत पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून एका आरोपीचा शोध सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार […]
ADVERTISEMENT

कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील तीन तरुणांनी आपल्याच जिवलग मित्राला पैशाच्या वादातून संपवल्याचं समोर आलं आहे. प्रशांत भिसे (वय २८) असं या मृत तरुणाचं नाव असून त्याचा अर्धवट जळालेला मृतदेह पोलीसांना मिळाला होता. या हत्याकांडाचा काही तासांत उलगडा करणण्यात पोलीसांना यश आलं आहे.
आतापर्यंत पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून एका आरोपीचा शोध सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार मयत प्रशांत संजय भिसे हा शिरोळ तालुक्यातील दानोळी इथला रहिवासी होता. प्रताप उर्फ गुंड्या माने, अमोल उर्फ दाद्या हराळे आणि सागर होलगे अशी तीन आरोपींची नावं आहेत. हे तिन्ही आरोपी प्रशांतचे जिवलग मित्र होते. प्रशांत हा बेरोजगार असल्यामुळे त्याने आपल्या तिन्ही मित्रांकडून काही पैसे उधार घेतले होते.
अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या मुलाचा खून करणाऱ्या आईला आणि तिच्या प्रियकराला अटक
१५ डिसेंबर रोजी प्रशांत आपल्या मित्रांसोबत गप्पा मारत बसला होता. यावेळी पैशांच्या देवाणघेवाणीतून त्याचा आपल्या मित्रांसोबत वाद झाला. या वादातून तिन्ही मित्रांनी धारदार शस्त्राने वार करत त्याची हत्या केली. हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी प्रशांतची मोटारसायकल एका विहीरीत टाकून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला.
सांगली : शेकोबा डोंगरावर दोन तरुणी आणि एका तरुणाची विष पिऊल आत्महत्या, तासगाव तालुक्यातली घटना
पोलिसांना प्रशांतचा मृतदेह कोथळी गावाच्या हद्दीत अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडला होता. मात्र प्रशांतचा चेहरा जळालेला नसल्यामुळे पोलिसांना त्याची ओळख पटली. आतापर्यंत पोलिसांनी प्रताम माने आणि सागर होळगे याला अटक केली असून तिसरा आरोपी अमोल हराळे फरार आहे.
पिंपरी-चिंचवड : अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची धारदार शस्त्राने वार करत हत्या