Dalljiet Kaur : घटस्फोटित महिलांना दुसऱ्यांदा लग्न करणाऱ्या अभिनेत्रीचा खास ‘मेसेज’

मुंबई तक

Dalljiet Kaur post : अभिनेत्री दलजीत कौर सध्या तिच्या दुसऱ्या लग्नामुळे चर्चेत आहे. दलजीतने 18 मार्च रोजी एनआरआय (अनिवासी भारतीय) असलेल्या निखील पटेलशी दुसरं लग्न केलं. यापूर्वी दलजीतने अभिनेता आणि बिग बॉस 16 फेम शालीन भनोटशी लग्न केलं होतं, पण ते फार काळ टिकलं नाही. आपसातील मतभेदांमुळे दोघांनी 2013 मध्ये घटस्फोट घेतला. त्यांना एक मुलगा […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Dalljiet Kaur post : अभिनेत्री दलजीत कौर सध्या तिच्या दुसऱ्या लग्नामुळे चर्चेत आहे. दलजीतने 18 मार्च रोजी एनआरआय (अनिवासी भारतीय) असलेल्या निखील पटेलशी दुसरं लग्न केलं. यापूर्वी दलजीतने अभिनेता आणि बिग बॉस 16 फेम शालीन भनोटशी लग्न केलं होतं, पण ते फार काळ टिकलं नाही. आपसातील मतभेदांमुळे दोघांनी 2013 मध्ये घटस्फोट घेतला. त्यांना एक मुलगा आहे. दीर्घ काळाच्या कायदेशीर लढाईनंतर दलजीत आणि शालीन वेगळे झाले. आता तिने नव्याने आयुष्य सुरू केलं आहे.

सावकरांवरून पुन्हा ठिणगी! राहुल गांधींविरोधात विधानसभेत गदारोळ

दलजीत कौरने एनआरआय निखील पटेलसोबत लग्न केलं. त्यानंतर तिला सोशल मीडियावर खूप ट्रोल केलं जात आहे. तिने पैशांसाठी लग्न केलं असल्याचं म्हणत यूजर्स तिला ट्रोल करत आहेत. यामुळे यूजर्संना प्रत्युत्तर देत तसंच, विधवा आणि घटस्फोटित महिलांचं मनोबल वाढावं आणि त्यांनी सकारात्मक दृष्टीने आयुष्याकडे पाहावं, यासाठी दलजीत कौरने एक पत्र लिहिलं आहे.

दलजीत कौरने पत्रात नेमकं काय लिहिलं?

दलजीतने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लिहिले की, ‘ईच्छा आणि आशा असणं महत्वाचं आहे. तुमच्या आयुष्याची व्याख्या कोणालाही ठरवू देऊ नका. यामुळे आपल्याकडे जे काही आहे ते सर्व आपल्या आयुष्याला द्या. कारण, जगण्यासाठी फक्त एकच जीवन आहे. जर तुम्ही स्वप्न पाहत असाल तर, ती स्वप्न पूर्ण करण्याची हिंमतही बाळगा.’

हे वाचलं का?

    follow whatsapp