अरे देवा! एअर इंडियाचं विमान अडकलं पुलाखाली; नक्की काय झालं?, व्हिडीओ झाला व्हायरल

विमान पादचाऱ्यांसाठी उभारलेल्या पूलाखाली अडकल्याचा व्हिडीओ व्हायरल... नेटकरीही झाले सैराट; वाचा मजेशीर कमेंट
अरे देवा! एअर इंडियाचं विमान अडकलं पुलाखाली; 
नक्की काय झालं?, व्हिडीओ झाला व्हायरल
पुलाखाली अडकलेलंं एअर इंडियाचं विमान...

विमान म्हटलं की एकतर हवेत उडताना दिसत किंवा विमानतळावर उभं असलेलं! आता कुणी विमान पादचारी पुलाखाली अडकल्याचं सांगितलं, तर ऐकायलाही वेगळंच वाटतं. पण, हे खरंच घडलं आहे. दिल्लीत एअर इंडियाचं विमान पादचाऱ्यांसाठी उभारण्यात आलेल्या पुलाखाली अडकलंय. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, नेटकरीही मजेशीर कमेंट करत आहेत.

सोशल मीडियावर एअर इंडियाच्या एका विमानाचा व्हिडीओ तुफान फिरतोय. एअर इंडियाचं विमान महामार्गावर बांधण्यात आलेल्या पादचारी पुलाखाली अडकल्याचं दिसत आहे. विमानाचे पंख काढून टाकण्यात आलेले आहेत.

नेमका प्रकार काय?

पादचारी पुलाखाली विमान अडकल्याचं हे दृश्य आहे दिल्ली विमानतळाजवळचं. दिल्ली-गुरुग्राम हायवेवर रात्रीच्या वेळी हे विमान अडकलं. पंखाजवळचा भाग पुलाखाली अडकल्याचं दिसत आहे. एअर इंडियाचं हे विमान इथे कसं आलं, असा प्रश्नही अनेकांना पडला.

यासंदर्भात आता इंडियानं खुलासा केला आहे. हे विमानात भंगारात काढण्यात आलं असून, ते विकण्यात आलं आहे. अडकलेल्या विमानाशी एअर इंडियाचा कसलाही संबंध नाही, असं कंपनीनं स्पष्ट केलं.

नेटकरी झाले सैराट...

एअर इंडियाचं पुलाखाली अडकलेलं पाहून नेटकऱ्यांना मात्र हसू अनावर झालंय. अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर भन्नाट कमेट केल्या आहेत. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात. राष्ट्रीय महामार्गावरून आणि तेही विमानानं... हे सगळं कल्पनेपलीकडचं असल्याचं एकाने म्हटलं आहे. तर माझं आयुष्यही असंच फसल्याचं एकाने म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.