NCB युनिटची नांदेडमध्ये धडक कारवाई, १११ किलो अमली पदार्थ जप्त

३ जणांना NCB ने घेतलं ताब्यात, मुद्देमाल जप्त
NCB युनिटची नांदेडमध्ये धडक कारवाई, १११ किलो अमली पदार्थ जप्त
हेरॉईन बनवण्यासाठी लागणाचा कच्चा माल या ठिकाणी NCB ला सापडला होता

राज्यातील अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या रॅकेटविरुद्ध NCB ने आता कंबर कसली आहे. नांदेडच्या कामठा भागात NCB युनिटने छापेमारी करुन १११ किलो dry poppy straw (हेरॉईन बनवण्यासाठी लागणारा पदार्थ) आणि १.४ किलो opium जप्त केलं आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईच्या NCB युनिटने आंध्र प्रदेशमधून ४९ गांजाची पोती घेऊन निघालेला ट्रक नांदेडमध्ये पकडला होता.

यानंतर NCB चं पथक मिळालेल्या माहितीच्या आधारावर राज्यातील विविध भागांत छापे टाकत आहे. कामठा भागात एका दुमजली इमारतीमध्ये अमली पदार्थ बनवण्याची फॅक्टरी चालवली जात असल्याची माहिती NCB ने दिली. तेलंगणा आणि कर्नाटक राज्याचे काही जिल्हे नांदेड शहरापासून जवळ असल्यामुळे इतर राज्यांचा विचार करुन कामठा भागात ही फॅक्टरी चालवली जात असल्याचा NCB ला संशय आहे. आजच्या कारवाईत जप्त केलेला माल नेमका कोणत्या राज्यातून आला याचा तपास NCB करत आहे.

या कारवाईदरम्यान NCB ने तीन जणांना ताब्यात घेतलं आहे. त्यांच्याकडून नोटा मोजण्याचं मशिन, दीड लाख रुपये रोख रक्कम, क्रशिंग मशिन असा मुद्देमाल मिळाला आहे. काही दिवसांपूर्वी नांदेडमध्येच झालेल्या कारवाईत NCB ने दोन जणांना अटक केली होती.

"आम्हाला मिळालेल्या ठराविक माहितीच्या आधारावर आम्ही नांदेडच्या कामठा भागातील तीन दुकानांवर छापेमारी केली. या छापेमारीत एका दुमजली इमारतीमध्ये अमली पदार्थ बनवण्याची फॅक्टरी दिसून आली. या कारवाईत तीन जणांना ताब्यात घेण्यात आलं असून रोख रकमेसह मुद्देमाल आम्ही जप्त केला आहे", अशी माहिती NCB चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in