राष्ट्रवादीच्या मंत्र्याला ईडीचा दणका!; साखर कारखान्यासह 13 कोटींची मालमत्ता जप्त
ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाकडून सुरू असलेल्या कारवायांवरून राज्यात राजकारण तापलेलं असतानाच आता ईडीने राष्ट्रवादीच्या आणखी एका मंत्र्यांवर कारवाई केली आहे. अहमदनगर येथील राम गणेश गडकरी सहकारी साखर कारखान्यासह ईडीने राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची 13.41 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात प्राजक्त तनपुरे यांनी महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणात चौकशी करण्यात […]
ADVERTISEMENT

ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाकडून सुरू असलेल्या कारवायांवरून राज्यात राजकारण तापलेलं असतानाच आता ईडीने राष्ट्रवादीच्या आणखी एका मंत्र्यांवर कारवाई केली आहे. अहमदनगर येथील राम गणेश गडकरी सहकारी साखर कारखान्यासह ईडीने राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची 13.41 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.
गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात प्राजक्त तनपुरे यांनी महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणात चौकशी करण्यात आली होती. कारण हा कारखाना खरेदी करण्यासाठी याच बँकेने त्यांना कर्ज दिलं होतं. या कारखान्याचा लिलाव 2012 मध्ये करण्यात आला होता.
कारखान्याची मूळ किंमत 26 कोटी रूपये होती. मात्र हा कारखाना प्राजक्त तनपुरेंनी लिलावात 13 कोटी 41 लाखांना विकत घेतला. या सर्व व्यवहारांवर ईडीला संशय आहे. त्यामुळेच ईडीने चौकशी केली होती. आता त्यापाठोपाठ ईडीने आज मेसर्स तक्षशिला सिक्युरिटीज प्रा. लि. च्या नावावर असलेल्या राम गणेश गडकरी साखर कारखान्याच्या 90 एकर जमिनीसर त्यांच्या मालकीची आणि कारखान्याशी संलग्न असणारी 4.6 एकरची जमीनही जप्त केली आहे.
ED ने 26.08.2019 रोजी आर्थिक गुन्हे शाखा, मुंबई पोलिसांकडून कलम 120B अन्वये आयपीसीच्या 420,467,468 आणि 471 आणि कलम 13(1)(b) नुसार नोंदवलेल्या FIR च्या आधारे PMLA तपास सुरू केला होता.