उस्मानाबादला पावसाने झोडपलं; शेतकरी म्हणतो,’पवारसाहेब फक्त स्टेजवर भिजून उपयोग नाही’

मुंबई तक

– गणेश जाधव, उस्मानाबाद प्रतिनीधी मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्याला पुन्हा एकदा पावसाने झोडपलं आहे. गेल्या १५ दिवसांत उस्मानाबादमध्ये दुसऱ्यांदा ढगफुटीसदृष्य पाऊस झाला आहे. खेड, तेर, ढोकी या परिसरात सलग तीन तास पावसाची संततधार कायम होती, ज्यामुळे सोयाबीनसह तूर, उस अशा पिकांचं नुकसान झालं आहे. निसर्गाच्या अवकृपेमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

– गणेश जाधव, उस्मानाबाद प्रतिनीधी

मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्याला पुन्हा एकदा पावसाने झोडपलं आहे. गेल्या १५ दिवसांत उस्मानाबादमध्ये दुसऱ्यांदा ढगफुटीसदृष्य पाऊस झाला आहे. खेड, तेर, ढोकी या परिसरात सलग तीन तास पावसाची संततधार कायम होती, ज्यामुळे सोयाबीनसह तूर, उस अशा पिकांचं नुकसान झालं आहे. निसर्गाच्या अवकृपेमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल आपली नाराजी व्यक्त केली आहे.

पवार साहेब फक्त स्टेजवर भिजून उपयोग नाही, शेतकरी आता खरा भिजला आहे त्याला मदत करा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

“माझं शिक्षण पूर्ण झाल्यावर केवळ खुल्या प्रवर्गात येत असल्यामुळे मी बेरोजगार राहिलो. शेती करायचा निर्णय घेतला तेव्हा निसर्गानेही अशी अवस्था करुन ठेवली आहे. माझी ९० टक्के शेती पाण्यात आहे. पवार साहेब फक्त स्टेजवर भिजून उपयोग होत नाही, शेतकरी आता खऱ्या अर्थाने भिजला आहे त्याला मदत करा. आमदार-खासदार फक्त रस्त्याच्या कडेला येऊन पाहणी करुन जातात. मागे बचावासाठी हेलिकॉप्टर आलं त्याचं श्रेय घेण्यासाठी भांडणं सुरु झाली. आमदार-खासदारांनी एक रपयाचीही मदत न करता आमच्यासोबत शेतात फिरून दाखवावं”, अशी उद्विग्न प्रतिक्रीया काकासाहेब लोमटे या तरुण शेतकऱ्याने दिली.

उस्मानाबादमध्ये झालेल्या पावसामुळे शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेलं पिक वाया गेलं. सोयाबीनचं पिक पाण्यात राहिल्यामुळे त्याची कुजून नासाडी होत आहे. सरकारने पंचनाम्यांमध्ये वेळ न घालवता तात्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी सध्या शेतकऱ्यांकडून होते आहे. पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी वाहून गेल्यामुळे जगावं की मरावं अशी अवस्था आली आहे. शिवसेनेचे तीन आमदार, एक खासदार असतानाही उस्मानाबादेत शेतकऱ्यांना मदत जाहीर नाही असं म्हणत शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. एकराला ५० हजार मदत जाहीर करा अन्यथा आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नसल्याचंही शेतकऱ्यांनी सांगितलं.

वेळप्रसंगी कर्ज काढू पण शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही – अजित पवार

हे वाचलं का?

    follow whatsapp