स्वातंत्र्यावर बोलायची Kangana ची औकात नाही, हा देशाचा अपमान - राजू शेट्टी कडाडले

कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन देशभरात गदारोळ
स्वातंत्र्यावर बोलायची Kangana ची औकात नाही, हा देशाचा अपमान - राजू शेट्टी कडाडले

1947 साली मिळालेले स्वातंत्र्य हे स्वतंत्र नसून ती भीक होती, खरे स्वातंत्र्य हे 2014 साली मिळाले असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे, कंगना रणौनते केलेल्या या वक्तव्यावरुन सध्या देशभरात चांगलाच गदारोळ निर्माण झाला आहे. राजकीय स्तरातूनही या वक्तव्याचा समाचार घेतला जात आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी कंगनाची चांगलीच खरडपट्टी काढली आहे.

कंगना रणौतची स्वातंत्र्य यासारख्या मोठ्या विषयावर बोलण्याची औकात आहे का हे आधी तिने तपासून पहावं अशा शब्दांत शेट्टींनी कंगनाचा समाचार घेतला आहे. राजू शेट्टी बुलढाण्यातील चिखली येथे बोलत होते.

स्वातंत्र्यावर बोलायची Kangana ची औकात नाही, हा देशाचा अपमान - राजू शेट्टी कडाडले
Kangana Ranaut: '1947 साली स्वातंत्र्य नाही तर भीक मिळाली, खरं स्वातंत्र्य 2014 साली मिळालं', कंगनाचं वादग्रस्त विधान

पुढे बोलताना शेट्टी म्हणाले की, "भगतसिंग पासून ते नेताजी सुभाष चंद्र बोस पर्यंत स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेकांनी हुतात्मे पत्करले, त्याचबरोबर स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर महात्मा गांधींनी देखील देश एक केला होता, आणि कंगना राणावत सारख्या एखाद्या नटीने अशा पद्धतीचे वक्तव्य करणे म्हणजे हा स्वातंत्र्याचा नाही तर संपूर्ण देशाचा अपमान आहे."

पाहा कंगनाचं नेमकं विधान काय

'सावरकर, राणी लक्ष्मीबाई, नेताजी सुभाषचंद्र बोस या लोकांबद्दल बोललो तर या लोकांना माहित होते की रक्त सांडावं लागेल. पण ते हिंदुस्थानी-हिंदुस्थानींचं रक्त सांडू नये.. अर्थातच त्यांनी स्वातंत्र्याची किंमत चुकवली. पण तेव्हा जे स्वातंत्र्य मिळालं ती भीक होती. आपल्याला खरं स्वातंत्र्य हे 2014 साली मिळालं आहे.'

या कार्यक्रमात कंगना असंही म्हणाली की, 'काँग्रेसची सत्ता असताना मला दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. जेव्हा मी राष्ट्रवाद, सैन्य सुधारणा आणि माझ्या संस्कृतीचा प्रचार करते तेव्हा लोक म्हणतात की, मी भाजपचा अजेंडा चालवत आहे. खरं तर हा मुद्दा भाजपचा अजेंडा का असावा.. हा तर देशाचा अजेंडा असला पाहिजे.'

कंगनाला पद्मश्री पुरस्कार प्रदान

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतला नुकतेच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते तिचा सन्मान करण्यात आला आहे. कंगना हा पुरस्कार मिळाल्यानंतर तिचे चाहते तिचे खूप कौतुक करत आहेत. पण अनेकांनी तिला जोरदार ट्रोल देखील केलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in