आमदार अमोल मिटकरी हिंदू समाजाची माफी मागा, ब्राह्मण समाज समितीची एकमुखी मागणी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी हिंदू समाजाबद्दल अपशब्द वापरून धार्मिक भावना दुखावल्याबद्दल त्यांच्या वर कारवाई करावी अशी मागणी सकल ब्राह्मण समाज समितीने केली आहे. एवढंच नाही तर मिटकरींनी हिंदू समाजाची माफी मागावी अशीही मागणी करण्यात आली आहे. ठाकरे, सोमय्या, फडणवीस; अमोल मिटकरींनी तिघांनाही घेरलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी इस्लामपूर येथे […]
ADVERTISEMENT

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी हिंदू समाजाबद्दल अपशब्द वापरून धार्मिक भावना दुखावल्याबद्दल त्यांच्या वर कारवाई करावी अशी मागणी सकल ब्राह्मण समाज समितीने केली आहे. एवढंच नाही तर मिटकरींनी हिंदू समाजाची माफी मागावी अशीही मागणी करण्यात आली आहे.
ठाकरे, सोमय्या, फडणवीस; अमोल मिटकरींनी तिघांनाही घेरलं
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी इस्लामपूर येथे झालेल्या जाहीर सभेत हिंदू समाजाच्या चालीरीती आणि परंपरा यांची खिल्ली अमोल मिटकरींनी उडवली आहे. त्यामुळे समाजात सर्वत्र संतापाची भावना निर्माण झाली आहे. मिटकरी ही व्यक्ती राज्याचा जबाबदार आमदार असून, त्यांनी हिंदू समाजात पौरोहित्य करणाऱ्यां बाबत आणि विवाह परंपरेबाबत स्वतःला कुठलेही ज्ञान नसतांना चुकीचे विधान करून समाजाची खिल्ली उडवली आहे. त्यांनी अकारण जातीय तेढ निर्माण केली आहे. अशा प्रकारची कृती बालिश बुद्धीतून आणि अमानवीय आहे. याचा समस्त हिंदू बांधवांनी निषेध केला आहे. या घटनेबाबत अमोल मिटकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हिंदू समाजाची जाहीर माफी मागावी अशी मागणी समस्त ब्राह्मण समाज समिती अंबाजोगाई आणि पेशवा युवा मंच यांनी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. या निवेदनाच्या प्रती उपविभागीय अधिकारी अंबाजोगाई, पोलिस स्टेशन अंबाजोगाई यांच्याकडे देऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे.
पंढरपूरमध्येही निषेध