सुप्रिया सुळेंनी सांगितलं शरद पवारांच्या पावसातल्या सभेचं गुपित

मुंबई तक

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज साताऱ्यात झालेल्या शरद पवारांच्या पावसातल्या सभेबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. “शरद पवारांनी रिटायर्ड झालं पाहिजे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.मात्र शरद पवारांना रिटायर्ड करायचं हे महाराष्ट्राने ठरवलं नव्हतं. मग एक देवेंद्र फडणवीस काय करणार? अख्खा महाराष्ट्र एकीकडे राहिला आणि देवेंद्र फडणवीस एका बाजूला राहिले. त्यावेळी जर शऱद पवारांनी असा […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज साताऱ्यात झालेल्या शरद पवारांच्या पावसातल्या सभेबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. “शरद पवारांनी रिटायर्ड झालं पाहिजे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.मात्र शरद पवारांना रिटायर्ड करायचं हे महाराष्ट्राने ठरवलं नव्हतं. मग एक देवेंद्र फडणवीस काय करणार? अख्खा महाराष्ट्र एकीकडे राहिला आणि देवेंद्र फडणवीस एका बाजूला राहिले. त्यावेळी जर शऱद पवारांनी असा विचार केला असता की देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत तर मी रिटायर्ड होतो. पण त्यांनी तसा विचार केला नाही असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या. नवी मुंबईतल्या भाषणात सुप्रिया सुळे बोलत होत्या. आपल्या भाषणात त्यांनी गणेश नाईक यांनाही काही टोले लगावले.

“दीड वर्षापूर्वी काय परिस्थिती होती? मी रोज सकाळी उठायचे आणि मला कळायचं आज कुणी पक्ष सोडला.. एखाद्या दिवशी जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणी सोडला नाही तर मला वाटायचं चला आज देव पावला. नेमका त्याच्या पुढचा दिवस असा असायचा की एकदम जास्त लोक सोडून जायचे. तेव्हा मी स्वतःला समजावायचे नाही 50 की 52 लोक पवारसाहेबांना सोडून गेले होते त्यातला एकही आमदार झाला नाही. पण 2019 च्या वेळेला कुठे अशी परिस्थिती होती? पण पावसातली सभा झाली आणि काय घडलं तुम्हाला माहित आहे.”

पावसाच्या सभेचं गुपित

हे वाचलं का?

    follow whatsapp