पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पुन्हा एकदा केली अमेरिकेची निंदा

जाणून घ्या काय म्हणाले इम्रान खान..
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पुन्हा एकदा केली अमेरिकेची निंदा

अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन यांनी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांचीही भेट घेतली. भारत आणि अमेरिका यांचे संबंध चांगले होतील अशी आशा असतानाच आता पाकिस्तान आणि अमेरिका यांच्यातले संबंध काही चांगले आहेत असं दिसत नाही. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अमेरिकन मीडियाला दिलेल्या मुलाखतीत बायडेन यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

इम्रान खान यांनी अमेरिकेच्या मीडियाला दिलेल्या मुलाखतीत अशी तक्रार केली आहे की राष्ट्रपती ज्यो बायडेन हे खूप बिझी आहे. त्यांच्याकडे बोलण्यासाठी वेळ नाही असंही इम्रान खान म्हणाले आहेत. ज्यो बायडेन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट होत असताना इमरान खान यांनी अमेरिकेवर टीका केली. संयुक्त राष्ट्र मंचावर अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेची निंदा करत होते. इम्रान खान हे देखील म्हणाले की बायडेन यांच्याशी संवाद कमी आहे. याबाबत व्हाईट हाऊसचे प्रवक्ते जने यांनी सांगितलं की पाकिस्तानचा परराष्ट्र विभाग, संरक्षण विभागाच्या टॉप लीडर्ससोबत आम्ही चर्चा करतो आहोत. हे खरं आहे की बायडेन प्रत्येक नेत्यांशी चर्चा करत नाही. पण त्यांच्याकडे एक तज्ज्ञांची टीम आहे जी या चर्चांसाठीच तयार करण्यात आली आहे.

जानेवारी 2021 मध्ये ज्यो बायडेन यांनी अमेरिकेचे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. 15 सप्टेंबरला बायडेन यांच्यावर इम्रान खान यांनी टीका केली. ते मीडियाला उद्देशून हे देखील म्हणाले की तुम्ही बायडेन यांना का विचारत नाही के ते पाकिस्तानशी का बोलत नाही? मी त्यांच्या फोनची वाट बघतोय का तर असं मुळीच नाही. त्यांची इच्छा असेल तर त्यांनी संवाद साधावा. तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केला मात्र याबाबत त्यांच्याशी काहीही चर्चा झालेली नाही असंही इम्रान खान म्हणाले.

Related Stories

No stories found.