शरद पवारांची अहमदाबादमध्ये अमित शाह यांच्याशी शनिवारी भेट? जाणून घ्या नेमकं काय घडलं
अहमदाबाद: महाविकास आघाडी सरकारमधल्या कुरबुरींवर आज थेट शिवसेनेचे मुखपत्र सामनात भाष्य करण्यात आलंय. संजय राऊत यांनी अनिल देशमुख यांच्या कार्यक्षमेतवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांना अक्सिडेंटल होम मिनिस्टर ठरवलंय. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरच आता एक अत्यंत महत्त्वाची घडामोड समोर येते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी अहमदाबादमध्ये एका बड्या उद्योगपतीची भेट घेतल्याचं कळतंय. पवार […]
ADVERTISEMENT

अहमदाबाद: महाविकास आघाडी सरकारमधल्या कुरबुरींवर आज थेट शिवसेनेचे मुखपत्र सामनात भाष्य करण्यात आलंय. संजय राऊत यांनी अनिल देशमुख यांच्या कार्यक्षमेतवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांना अक्सिडेंटल होम मिनिस्टर ठरवलंय. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरच आता एक अत्यंत महत्त्वाची घडामोड समोर येते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी अहमदाबादमध्ये एका बड्या उद्योगपतीची भेट घेतल्याचं कळतंय. पवार आणि पटेल यांची उद्योगपती गौतम अदानी यांच्याशी भेट झाली. महत्त्वाचं म्हणजे पवार आणि पटेल यांचा हा दौर पूर्वनियोजित होता. केवडिया येथील साखर संमेलनात दोघंही सहभागी होणार होते.
‘अनिल देशमुखांना अपघातानं मिळालं गृहमंत्रीपद’, सामनातून शिवसेनेचा गौप्यस्फोट
पण हा पूर्वनियोजित कार्यक्रमच झाला नाही. पण पवार आणि पटेल यांची अदानी यांच्याशी भेट मात्र झाली. या भेटीनंतर दोघंही शनिवारी सकाळी ११ च्या सुमारा मुंबईला परतले.