ठाण्यातील शिवसेनेचे फायरब्रँड नेते अनंत तरे यांचे निधन

मुंबई तक

ठाणे: ठाणे शहराचे माजी महापौर, माजी आमदार आणि कोळी समाजाचे नेते अनंत तरे यांचं आज (22 फेब्रुवारी) निधन झालं आहे. मागील दोन महिन्यापासून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु आज पावणे पाच वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा, दोन नातवंडे भाऊ असा परिवार आहे. निधनसमयी त्यांचं वय 67 होतं. दरम्यान, […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

ठाणे: ठाणे शहराचे माजी महापौर, माजी आमदार आणि कोळी समाजाचे नेते अनंत तरे यांचं आज (22 फेब्रुवारी) निधन झालं आहे. मागील दोन महिन्यापासून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु आज पावणे पाच वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा, दोन नातवंडे भाऊ असा परिवार आहे. निधनसमयी त्यांचं वय 67 होतं. दरम्यान, उद्या (मंगळवारी) दुपारी दोन वाजेच्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

अनंत तरे यांचं ब्रेन हॅमरेज झाल्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्यावर ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. ठाण्यातील शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांपैकी अनंत तरे हे एक होते. ठाण्यातील कोळी समाजातून त्यांचं नेतृत्व उदयाला आलं होतं. ठाण्यात शिवसेना वाढीसाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले होते. याशिवाय सक्रीय राजकारणात असताना त्यांनी ठाणे महापालिकेचं महापौर पद देखील भूषवलं होतं. दरम्यान, त्यांच्या निधनामुळे ठाण्यात शिवसेनेला मात्र मोठा धक्का बसला आहे.

ही बातमी पाहा: मुंबईतील हॉटेलात खासदाराचा मृतदेह सापडला, आत्महत्या केल्याचा अंदाज

अनंत तरे यांची राजकीय कारकीर्द

हे वाचलं का?

    follow whatsapp