मोठी बातमी! अमरावतीत एक दिवसाचा लॉकडाऊन

मुंबई तक

कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन अमरावतीमध्ये एक दिवसाचा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी यासंदर्भातले आदेश दिले आहेत. शनिवारी रात्री 8 वाजल्यापासून सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत हा लॉकडाऊन असणार आहे असं शैलेश नवाल यांनी म्हटलं आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे असं नवाल यांनी म्हटलं आहे. तसंच […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन अमरावतीमध्ये एक दिवसाचा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी यासंदर्भातले आदेश दिले आहेत. शनिवारी रात्री 8 वाजल्यापासून सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत हा लॉकडाऊन असणार आहे असं शैलेश नवाल यांनी म्हटलं आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे असं नवाल यांनी म्हटलं आहे. तसंच लॉकडाऊनच्या नियमांचं काटेकोर पालन लोकांनी करावं असंही आवाहन त्यांनी केलं आहे. लग्न समारंभात 50 पेक्षा जास्त लोक जमा होणार नाहीत याची दक्षता घ्यावी असंही त्यांनी म्हटलं आहे. तसंच रिक्षामध्ये दोन प्रवाशांपेक्षा जास्त प्रवासी आणि चारचाकीमध्ये चार पेक्षा जास्त प्रवाशांनी प्रवास करू नये असंही त्यांनी म्हटलं आहे. जर हा नियम पाळला गेला नाही तर दंडात्मक कारवाई होईल असंही स्पष्ट केलं आहे.

हे पण वाचा- चिंता वाढवणारी बातमी, महाराष्ट्रात पुन्हा कोरोनाचा कहर

अमरावती, यवतमाळ आणि बुलढाणा या तिन्ही शहरांमध्ये कोरोना रूग्णांची संख्या वाढते आहे. गेल्या चार दिवसांपासून अमरावतीत कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. 14 फेब्रुवारीला 435 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आणि दोघांचा मृत्यू झाला. 15 फेब्रुवारीला 439 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आणि चार जणांचा मृत्यू झाला तर 16 फेब्रुवारीला 495 रुग्ण पॉझिटिव्ह होते. 17 तारखेला म्हणजेच काल 498 रुग्ण आढळले आहेत तर सहा जणांचा मृत्यू झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घ्यावा लागला असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लॉकडाऊनबद्दल काय म्हटलं आहे पाहा मुंबई तकचा व्हीडिओ

हे वाचलं का?

    follow whatsapp