थोडासा दिलासा, राज्यात नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत काहीशी घट
मुंबई: मागील 24 तासात महाराष्ट्रात कोरोनाचे 8,744 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहे. गेल्या तीन दिवसातील ही रुग्णांची सर्वात कमी संख्या आहे. मागील तीन दिवसांपासून राज्यात 10 हजारांहून अधिक पॉझिटिव्ह रुग्ण आढळत होते. त्यामुळे आज कोरोना रुग्णांच्या संख्येत काहीशी घट झाली आहे. जी दिलासादायक बाब आहे. दरम्यान, गेल्या 24 तासात 22 कोरोना बाधितांनी आपले प्राण गमावले […]
ADVERTISEMENT

मुंबई: मागील 24 तासात महाराष्ट्रात कोरोनाचे 8,744 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहे. गेल्या तीन दिवसातील ही रुग्णांची सर्वात कमी संख्या आहे. मागील तीन दिवसांपासून राज्यात 10 हजारांहून अधिक पॉझिटिव्ह रुग्ण आढळत होते. त्यामुळे आज कोरोना रुग्णांच्या संख्येत काहीशी घट झाली आहे. जी दिलासादायक बाब आहे. दरम्यान, गेल्या 24 तासात 22 कोरोना बाधितांनी आपले प्राण गमावले आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर हा 2.36 टक्के एवढा आहे. सध्या राज्यात 97,637 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
दुसरीकडे एक चांगली बाब म्हणेज आज राज्यात 9,068 कोरोना रुग्ण हे बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत 20,77,112 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे रिकव्हरी रेट हा 93.21 टक्के इतका आहे.
आज मुंबईत 1014 रुग्ण सापडले आहेत. तर पुण्यात 1030 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर नागपूरमध्ये 1396 आणि अमरावतीमध्ये 435 नवे रुग्ण सापडले आहेत.
कोरोना रूग्ण वाढू लागल्याने औरंगाबादमध्ये १० दिवसांचा Lockdown