Urmila Matondkar Covid Positive: अभिनेत्री उर्मिला मातोंडकरला कोरोनाची लागण

मुंबई तक

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर हिला कोरोनाची लागण झाली आहे. याबाबतची माहिती तिने स्वत: आज सकाळी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर उर्मिलाने स्वतःला घरीच क्वारंटाइन करुन घेतले आहे. यासोबतच दिवाळीच्या निमित्ताने प्रत्येकाने स्वतःची काळजी घेण्याचे आवाहनही तिने केले आहे. उर्मिला मातोंडकरने ट्विट करुन अशी माहिती दिली आहे की, […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर हिला कोरोनाची लागण झाली आहे. याबाबतची माहिती तिने स्वत: आज सकाळी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर उर्मिलाने स्वतःला घरीच क्वारंटाइन करुन घेतले आहे. यासोबतच दिवाळीच्या निमित्ताने प्रत्येकाने स्वतःची काळजी घेण्याचे आवाहनही तिने केले आहे.

उर्मिला मातोंडकरने ट्विट करुन अशी माहिती दिली आहे की, ‘मला कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह झाली आहे. मी सध्या ठीक आहे आणि मी स्वतःला होम क्वारंटाईन असून स्वत:ला आयसोलेट केलं आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांना विनंती आहे की त्यांनी त्वरित स्वत:ची चाचणी करुन घ्यावी.’

दरम्यान, उर्मिला मातोंडकरने आपल्या चाहत्यांना आवाहन केलं आहे की, दिवाळीच्या सणात प्रत्येकाने स्वतःची काळजी घ्यावी. याबाबत तिने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ‘तुम्हा सर्व प्रियजनांना नम्र विनंती आहे की, दिवाळी सणादरम्यान तुम्ही स्वतःची काळजी घ्या.’

उर्मिलाने तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात बालकलाकार म्हणून केली होती. ती पहिल्यांदा 1977 साली ‘कर्मा’ चित्रपटात दिसली होती, पण ‘मासूम’ (1983) या चित्रपटातून तिला खरी ओळख मिळाली. त्यानंतर ‘रंगीला’, ‘जुदाई’, ‘खूबसूरत’, ‘जंगल’, ‘प्यार तूने क्या किया’, ‘एक हसीना थी’ आणि ‘पिंजर’ यांसारखे एका पेक्षा एक हिट चित्रपटात तिने काम केले आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp