अरे देवा! एअर इंडियाचं विमान अडकलं पुलाखाली; नक्की काय झालं?, व्हिडीओ झाला व्हायरल
विमान म्हटलं की एकतर हवेत उडताना दिसत किंवा विमानतळावर उभं असलेलं! आता कुणी विमान पादचारी पुलाखाली अडकल्याचं सांगितलं, तर ऐकायलाही वेगळंच वाटतं. पण, हे खरंच घडलं आहे. दिल्लीत एअर इंडियाचं विमान पादचाऱ्यांसाठी उभारण्यात आलेल्या पुलाखाली अडकलंय. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, नेटकरीही मजेशीर कमेंट करत आहेत. सोशल मीडियावर एअर इंडियाच्या एका विमानाचा व्हिडीओ तुफान फिरतोय. […]
ADVERTISEMENT

विमान म्हटलं की एकतर हवेत उडताना दिसत किंवा विमानतळावर उभं असलेलं! आता कुणी विमान पादचारी पुलाखाली अडकल्याचं सांगितलं, तर ऐकायलाही वेगळंच वाटतं. पण, हे खरंच घडलं आहे. दिल्लीत एअर इंडियाचं विमान पादचाऱ्यांसाठी उभारण्यात आलेल्या पुलाखाली अडकलंय. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, नेटकरीही मजेशीर कमेंट करत आहेत.
सोशल मीडियावर एअर इंडियाच्या एका विमानाचा व्हिडीओ तुफान फिरतोय. एअर इंडियाचं विमान महामार्गावर बांधण्यात आलेल्या पादचारी पुलाखाली अडकल्याचं दिसत आहे. विमानाचे पंख काढून टाकण्यात आलेले आहेत.
नेमका प्रकार काय?
पादचारी पुलाखाली विमान अडकल्याचं हे दृश्य आहे दिल्ली विमानतळाजवळचं. दिल्ली-गुरुग्राम हायवेवर रात्रीच्या वेळी हे विमान अडकलं. पंखाजवळचा भाग पुलाखाली अडकल्याचं दिसत आहे. एअर इंडियाचं हे विमान इथे कसं आलं, असा प्रश्नही अनेकांना पडला.