ठाकरे सरकारमधील आणखी एक मंत्री यशोमती ठाकूर कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई तक

महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. अशात ठाकरे सरकारमधले मंत्रीही कोरोनाच्या विळख्यात सापडू लागले आहेत. बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड आणि प्राजक्त तनपुरे यांच्या पाठोपाठ आता यशोमती ठाकूर यांनाही कोरोना झाला आहे. राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनाही कोरोना झाला आहे. विरोधी पक्षातील म्हणजेच भाजपमधील राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील यांनाही कोरोना […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. अशात ठाकरे सरकारमधले मंत्रीही कोरोनाच्या विळख्यात सापडू लागले आहेत. बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड आणि प्राजक्त तनपुरे यांच्या पाठोपाठ आता यशोमती ठाकूर यांनाही कोरोना झाला आहे. राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनाही कोरोना झाला आहे. विरोधी पक्षातील म्हणजेच भाजपमधील राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील यांनाही कोरोना झाला आहे.

काय म्हटलं आहे यशोमती ठाकूर यांनी ट्विटमध्ये?

माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे. मला कोणतेही लक्षणे नाही, तरीही डॉक्टरांच्या सल्ल्याने मी पुढील उपचार घेणार आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी. सगळ्यांना या निमित्ताने आवाहन करत आहे, आपण मास्क वापरावा, काळजी घ्यावी. असं आवाहन यशोमती ठाकूर यांनी केलं आहे.

दोन दिवसांपूर्वीच राज्याचं हिवाळी अधिवेशन संपलं आहे. यामध्ये वर्षा गायकवाड आणि यशोमती ठाकूर, बाळासाहेब थोरात, प्राजक्त तनपुरे यांची उपस्थिती होती. त्याचप्रमाणे राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजपचे इतर नेतेही होतेच. राज्यात रूग्णांची संख्या वाढू लागली आहे. मुंबईत आणि महाराष्ट्रात कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. यामुळे काळजी घेण्याचं आवाहन केलं जात असतानाच आता ठाकरे सरकारमधील एक एक मंत्रीही कोरोना पॉझिटिव्ह येत आहेत. रूग्ण दुपटीचा वेग लक्षात घेता राज्यात पुन्हा लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण होऊ शकते असंही मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp